Download App

नगरकरांनो लक्ष द्या! पाणीपुरवठ्याचे वेळापत्रक कोलमडले, शहरात एक दिवस उशीराने येणार पाणी

  • Written By: Last Updated:

अहमदनगर : महावितरण कंपनीकडून महत्वाच्या कामांसाठी उद्या शनिवारी (दि. 26) रोजी मुळा धरण येथील विद्युत वाहिनीवर सकाळी 11 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत शट डाउन घेण्यात येणार आहे. वीजपुरवठा खंडित केलेल्या काळातच अमृत योजनेवरील दुरूस्तीची कामे केली जाणार आहे. दरम्यान या कामामुळे नगरकरांच्या पाणी पुरवठ्याचे (Water supply) वेळापत्रक कोलमडणार आहे. या कामामुळे नगर शहराच्या मध्यवर्ती भागासह उपनगर भागास एक दिवस उशीराने पाणी पुरवठा होणार असल्याची माहिती महापालिकेने (Ahmednagar Municipality) दिली आहे.

शहरातील पाणी पुरवठा होणार विस्कळीत
शनिवार नगर शहरातील बोल्हेगाव, नागापूर, सावेडी, मुकुंदनगर तसेच सारसनगर, बुरूडगाव रस्ता, केडगाव, कल्याण रस्त्यावरील शिवाजीनगर परिसर भागास सकाळी 11 नंतरचा पाणी पुरवठा होणार नाही. तर हा पाणीपुरवठा रविवारी (दि. 27) रोजी होणार आहे.

शरद पवारांनी महागाई, बेरोजगारीवरून केंद्राला फटकारले, कांद्यावरून एकनाथ शिंदेंना सुनावले ! 

तसेच रविवारी रोटेशननुसार पाणी वाटप असलेल्या मंगलगेट, रामचंद्रखुंट, झेंडीगेट, जुना जिल्हाधिकारी कार्यालय परिसर, दाळमंडई, काळू बागवान गल्ली, धरती चौक, बंगाल चौकी, माळीवाडा, कोठी या भागात व गुलमोहर रस्ता, प्रोफेसर कॉलनी परिसर, सिव्हील हाडको, प्रेमदान हाडको, टी.व्ही.सेंटर परिसर, म्युनिसीपल हडको, स्टेशन रस्ता, आगरकर मळा, विनायक नगर या भागास सोमवारी (दि. 28) पाणी सोडण्यात येणार आहे.

‘या’ भागांना मंगळवारी पाणीपुरवठा होणार
सिध्दार्थनगर, लालटाकी, तोफखाना, दिल्लीगेट, नालेगाव, चितळे रस्ता, आनंदी बाजार, कापड बाजार, ख्रिस्त गल्ली, पंचपीर चावडी, जुने मनपा कार्यालय परिसर, माळीवाडा, बालिकाश्रम रोड परिसर व सावेडी या भागांमध्ये सोमवारी होणार पाणी हा मंगळवारी (दि. 29) रोजी होणार आहे.

पाणीपुरवठा विस्कळीत होणार असल्याने नागरिकांनी पाण्याचे योग्य ते नियोजन करून ठेवावे. तसेच पाण्याचा वापर काटकसरीने करावा असे आवाहन देखील महानगर पालिकेच्या वतीने करण्यात आले आहे.

Tags

follow us