Download App

Loksabha Result 2024 : पश्चिम महाराष्ट्रात महाविकास आघाडीचा डंका…आत्तापर्यंतचा निकाल काय सांगतो?

लोकसभा निवडणुकीची मतमोजणी सुरु असून पश्चिम महाराष्ट्रातील माढा, माळशिरस, शिरुर, हातकणंगले, बारामती आणि कोल्हापुरात महाविकास आघाडीचाच डंका असल्याचं दिसून येतंय.

Image Credit: Letsupp

Loksabha Election Results 2024 : देशात 18 व्या लोकसभेसाठी सात टप्प्यांत मतदान पार पडलं असून आज अखेर मतमोजणीला सुरुवात (Loksabha Election Results) झालीयं. दुपारी 12 वाजेपर्यंत मतमोजणीच्या जवळपास 7 ते 8 फेऱ्या पूर्ण झाल्या असून एकंदरीत या चित्रावरुन इंडिया आघाडीकडून (India Alliance) आखण्यात आलेल्या रणनीतीचा फायदा होत असल्याचं चित्र सध्या महाराष्ट्रात दिसून येत आहे. महाराष्ट्रात भाजपविरोधात (BJP) वारं फिरलं असून अनेक मतदारसंघात महाविकास आघाडीच्याच उमेदवारांनी आघाडी घेतलीयं. माढा, माळशिरस, शिरुर, हातकणंगले, बारामती आणि कोल्हापुरात महाविकास आघाडीचे उमदेवार आघाडीवर असून पुणे आणि मावळमध्ये महायुतीच्या उमेदवारांनी धोबीपछाड दिलायं. तर सांगलीमधून विशाल पाटील यांनी दोन्ही उमेदवारांना पिछाडीवर सोडल्याचं चित्र दिसून येत आहे.

Lok Sabha Election Result: सिंधुदुर्गमध्ये- नारायण राणे तर रायगडात सुनिल तटकरे आघाडीवर, अनंत गीते पिछाडीवर

सोलापुरातील माढ्यात महाविकास आघाडीचे उमेदवार धैर्यशील मोहिते पाटील 9 हजार 431 मतांनी आघाडीवर आहेत. तर महायुतीचे उमेदवार रणजितसिंह निंबाळकर यांना आत्तापर्यंत 99 हजार 678 मते मिळालीत. धैर्यशील मोहित पाटलांना आत्तापर्यंत 1 लाख 9 हजार 109 मते मिळाली आहेत. अद्यापही मतमोजणी सुरुच आहे. तसेच माळशिरसमधून महाविकास आघाडीच्या प्रणित शिंदे यांना पाचव्या फेरीअखेरीस 1 लाख 13 हजार 36 मते मिळाली असून महायुतीचे उमेदवार राम सातपुते 1 लाख 4 हजार 68 मतांवर आहेत. प्रणिती शिंदे या 8 हजार 968 मतांनी आघाडीवर आहेत.

सांगलीत भाकरी फिरणार?
सांगली लोकसभा मतदारसंघात सुरुवातीपासूनच अनेक नवनवीन ट्विस्ट पाहायला मिळाले आहेत. काँग्रेसने उमेदवारी न दिल्याने बंडखोरी करणारे विशाल पाटील यांना आत्तापर्यंत 1 लाख 54 हजार 725 मते मिळाली असून महायुतीचे उमेदवार संजय काका पाटील दुसऱ्या क्रमांकावर असून त्यांना 1 लाख 29 हजार 287 मते मिळालीत, तर मविआचे चंद्रहार पाटील यांना 21 हजार 30 मते मिळाली आहेत. निवडणूक आयोगाकडून उर्वरित फेऱ्यांची मतमोजणी सुरुच असून विशाल पाटील यांनी दोन्ही उमेदवारांना धोबीपछाड देत आघाडी घेतलीयं.

पुण्यातील चार लोकसभा मतदारसंघात लगबग; कशी आणि कुठे होणार मतमोजणी?

मावळ लोकसभा मतदारसंघात पुन्हा एकदा धनुष्यबाण येणार असल्याचं दिसून येतंय. महायुतीचे उमदेवार श्रीरंग आप्पा बारणेंना 2 लाख 36 हजार 597 मते मिळाली असून महाविकास आघाडीचे संजोग वाघेरे पाटील यांना 1 लाख 97 हजार 782 मते मिळालीत. बारणे 38 हजार 815 मतांनी आघाडीवर आहेत, मतमोजणी अजूनही सुरु असून त्यामुळे पुन्हा कमळच फुलणार असल्याचं बोललं जात आहे.

शिरुर लोकसभा मतदारसंघात विद्यमान खासदार अमोल कोल्हे गड राखत असल्याचं चित्र आहे. महाविकास आघाडीचे अमोल कोल्हे यांना आत्तापर्यंत 1 लाख 33 हजार 484 मते मिळाली असून महायुतीचे उमदेवार शिवाजीराव आढळराव पाटील यांना 1 लाख 14 हजार 728 मते मिळाली आहे. अद्यापही मतमोजणी सुरु असून अमोल कोल्हे 18 हजार 758 मतांनी आघाडीवर आहेत. पुणे लोकसभा मतदारसंघात चौथ्याफेरीअखेर महायुतीचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांना 1 लाख 54 हजार मते मिळालीत तर महाविकास आघाडीचे उमेदवार रविंद्र धंगेकर यांना 1 लाख 20 हजार मते मिळालीत, चौथ्याफेरीअखेरीस मुरलीधर मोहोळ 34 हजारांनी आघाडीवर आहेत.

कडव्या झुंजीमध्ये सुळेंना 4 हजार 432 चा लीड…
बारामती लोकसभा मतदारसंघात कडवी झुंज असल्याची परिस्थिती आहे. महाविकास आघाडीच्या उमेदवार सुप्रिया सुळे यांना सहाव्या फेरीअखेरीस 32 हजार 527 तर महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवारांना 28 हजार 95 मते मिळालीत. सहाव्या फेरीअखेरीस सुप्रिया सुळें 4 हजार 432 मतांनी आघाडीवर आहेत. सहाव्या फेरीत सुनेत्रा पवार यांना खडकवासल्यातून लीड मिळाल्याचं दिसून येत आहे.

कोल्हापूर मतदारसंघात महाविकास आघाडीचे उमदेवार छत्रपती शाहु महाराज 45 हजार 514 मतांनी आघाडीवर असून त्यांना आत्तापर्यंत 1 लाख 99 हजार 613 मते मिळाली आहेत. तर महायुतीचे उमेदवार संजय मंडलिक यांना 1 लाख 54 हजार 99 मते मिळाली असून अजूनही इतर फेऱ्यांची मतमोजणी सुरु आहे. त्यामुळे कोल्हापुरात शाहु महाराजांचाच विजय होणार असल्याचा दावा केला जातोयं.

हातकणंगलेमध्ये काटे की टक्कर?
हातकणंगलेमध्ये मविआचे सत्यजित पाटील यांना 1 लाख 37 हजार 586 तर महायुतीचे धैर्यशील माने यांना 1 लाख 34 हजार 885 मते मिळणार आहेत, तर राजू शेट्टी यांना 46 हजार 714 मते मिळालीत. सत्यजित पाटील 2 हजार 701 मतांनी आघाडीवर आहेत.

follow us

वेब स्टोरीज