राज्यात राजकीय भूकंपाची चर्चा सुरु असतानाच भाजपचे आमदार नितेश राणे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार भाजपसोबत का आले आहेत? याबद्दल स्पष्ट केलं आहे. आमदार नितेश राणे काल अहमदनगर दौऱ्यावर होते. ओंकार भागानगरे हत्याप्रकरणी राणेंनी भागानगरे कुटुंबियांची भेट घेतली. या भेटीनंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या कामांवर प्रभावित होत अजित पवार भाजपसोबत आल्याचं भाजपचे आमदार नितेश राणे यांनी स्पष्ट केलं आहे.
अजितदादांच्या बंडाने नगर शहरातील भाजपची राजकीय गणितं बिघडली… पदाधिकाऱ्यांमध्ये संभ्रम
आमदार राणे म्हणाले, देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विकासकामांवर प्रभावित होऊनच मी भाजप-शिवसेना युतीसोबत आलो आहे, असं अजित पवारांसारखे ज्येष्ठ नेत्यांनीच स्पष्ट केलंय तरीही तुमचा त्यांच्या शब्दावर विश्वास का बसत नाही? असा प्रतिसवाल राणेंनी केला आहे.
Sana Khan: धर्मासाठी बॉलीवूडला अलविदा करणारी प्रसिद्ध अभिनेत्रीच्या घरी नव्या पाहुण्याचे आगमन !
तसेच राज्यात हिंदुत्वाच्या विषयावर काहीच तडजोड केली जाणार नाही. जे लोकं आमच्यासोबत येतील तेही हिंदुत्वाचीच भाषा करणार आहेत. त्यांचही गोरक्षक कायदा, समान नागरी कायद्याला समर्थन राहणार असल्याचं नितेश राणेंनी सांगितलं आहे.
MS Dhoni: माहीच्या आयुष्यावर नवा सिनेमा; कोण साकारणार धोनीचा रोल? चाहते उत्सुक
यावेळी इतरही मुद्द्यांवर भाष्य करीत त्यांनी महाविकास आघाडी सरकारव टीका केली आहे. महाविकास आघाडी सरकारच्या काळात हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांवर अन्याय झाला असल्याचा आरोपही नितेश राणे यांनी केला आहे. केंद्र आणि राज्य सरकारमध्ये आम्ही समाजाच्या भावना सरकार दरबारी पोहचू शकतो, म्हणूनच मोर्चा काढण्यात येत असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं आहे.
दरम्यान, राज्यात राजकीय भूकंप झाल्याने राजकारणाची सर्वच समीकरणेच बदलल्याचं दिसून येत आहे. अजित पवारांच्या शपथविधीनंतर राष्ट्रवादीत दोन गट पडल्याचं स्पष्ट झालं आहे. त्यावरुन राज्याच्या राजकारणात रणकंदन पेटल्याचं दिसतंय. अशातच उद्धव ठाकरे, राज ठाकरे एकत्र येणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं. त्यावरही राणेंनी भाष्य करीत ठाकरेंवर टीका केलीय. ते म्हणाले, राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येतील असं मला वाटतं नाही, ते सर्व रश्मी ठाकरेंवरच अवलंबून असल्याचं राणेंनी मिश्किलपणे म्हटलंय.