Video : ठाकरेंच्या फक्त घोषणा; फडणवीस सरकारची थेट मदत, महाले काय म्हणाल्या?

विधानसभा अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी भाजप आमदार श्वेता महाले यांनी लेट्सअप मराठीशी बोलताना फडणवीस सरकारवर भाष्य केलं.

News Photo   2025 12 14T162307.428

Video : ठाकरेंच्या फक्त घोषणा; फडणवीस सरकारची थेट मदत, महाले काय म्हणाल्या?

गुटखा आणि अमलीजन्य पदार्थांवर कारवाई होत नाही (Police) असं नाही, पण हेही खर आहे की, ज्या प्रमाणात कारावाई व्हायला पाहिजे ती कारवाई होत नाही हे मान्य करत भाजप आमदार श्वेता महाले यांनी सरकारलाच घरचा आहेर दिला आहे. त्या लेट्सअप मराठीवर बोलत होत्या.

मुख्यमंत्री फडणवीस यांनी गृहमंत्री म्हणून त्यांच्या पद्धतीने काम करत आहेत. त्यांनी पोक्सो आणि अमली पदार्थ्यांच्या बाबत त्यांनी चांगल काम केलं आहे. परंतु, कायदे झाल्यानंतर अधिकारी आणि पोलिसांनी ते काम करणं महत्वाचं असतं असं म्हणत महाले यांनी पोलीस आणि अधिकारी योग्य काम करत नसल्याचं खापर फोडलं आहे.

Video : अधिवेशनात एकनाथ शिंदेंची मोठी घोषणा; गिरणी कामगारांसाठी महत्वाची बातमी

समाजात प्रत्येक महिलेविषयी आदर बाळगला तर समाजात अत्याचाराच्या आणि अन्यायाच्या घटना घडणार नाहीत. त्याचबरोबर, अनेक ठिकाणी लहान लहान मुलींची विक्री होत आहे हे गंभीर आहे. त्यावर आता हि मानसिकता कशी बदलेल हे पाहण महत्वाचं ठरणार आहे.  मागे मुंडे या डॉक्टर मुलीविषयी झालं त्यामध्येही फडणवीस यांनी महत्वाच काम केलं असंही त्या म्हणाल्या.

यावेळी शेतकऱ्यांविषयी बोलताना, महाले म्हणाल्या उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना फक्त घोषणा आणि बांधावर जाऊन पाहणी होत होती. परंतु, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कोणत्याही अधिवेशनाची वाट न पाहता शेतकऱ्यांना मदत केली. तसंच, सर्व शेतकऱ्यांची दिवाळी गोड होईल अशी सोय करून दिवाळीच्या दिवशीच शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे पडले आहेत असं म्हणत महाले यांनी फडणीस यांची बाजू यावेळी लावून धरली.

Exit mobile version