What Is Postal Voting : राज्यातील 29 महापालिकांसाठी झालेल्या महापालिका निवडणुकीसाठी मतमोजणीला सुरुवात झाली असून सुरुवातीला पोस्टल मतदानाची मोजणी होणार आहे. मात्र नेमकं पोस्टल मतदान म्हणजे काय? याबाबत जाणून घ्या.
पोस्टल मतदान म्हणजे काय?
काही मतदारांना प्रत्यक्ष मतदान केंद्रावर जाता येत नाही, म्हणून त्यांना पोस्टाने मत देण्याची परवानगी असते. उदा. सरकारी कर्मचारी (निवडणूक ड्युटीवर असलेले) पोलिस, होमगार्ड, सैन्य दलातील जवान, काही अपंग / वृद्ध मतदार हे लोक पोस्टल बॅलेट पेपर भरून टपालाने पाठवतात. निवडणूक निकालाच्या दिवशी EVM मशीनची मोजणी सुरू होण्यापूर्वी आधी पोस्टल मतांची मोजणी केली जाते नंतर ती मते उमेदवारांच्या एकूण मतांत जोडली जातात. पोस्टल मतसंख्या कमी असते, पण चुरशीच्या लढतीत (कमी फरक असल्यास) पोस्टल मते निकाल बदलू शकतात.
मुंबई महापालिकेत कोण बाजी मारणार?
मुंबई महापालिकेत देखील पोस्टल मतदानाची सुरुवात झाली असून या निवडणुकीत कोण बाजी मारणार याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. या निवडणुकीसाठी शिवसेना ठाकेर गट आणि मनसे यांची युती होती तर काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडीने आघाडी करत निवडणुकीच्या रिंगणात उतरली होती. तर भाजप आणि शिवसेना शिंदे गट यांची देखील या निवडणुकीत युती होती.
