Land For Sandipan Bhumre Driver : छत्रपती छत्रपती संभाजीनगरचे पालकमंत्री संजय शिरसाट यांच्यामागं जमीन घोटाळा अन् हॉटेल व्हवहार घोटाळ्याचा ससेमिला लागलेला असतानाच आता त्यांच्याच पक्षाचे खासदार संदिपान भुमरे आपल्या गाडी चालकाच्या जमी प्रमकरणामुळं अडचणीत येण्याची शक्यता आहे. (Land) भुमरे यांचे ड्रायव्हर असलेल्या जावेद रसूल यांना हैदराबादमधील सालार जंग कुटुंबातील वंशजांकडून तब्बल 150 कोटींची तीन एकर जमीन भेट म्हणून देण्यात आली आहे. आता हे संपूर्ण प्रकरण संशयाच्या भोवऱ्यात सापडलं आहे.
आता याप्रकरणी आर्थिक गुन्हे शाखेकडून खासदार संदीपान भुमरे,आमदार विलास भुमरे आणि त्यांचा चालक जावेद रसूल यांची चौकशी सुरू करणयात आली आहे. परभणीतील एका वकिलानं दाखल केलेल्या तक्रारीवरुन आर्थिक गुन्हे शाखेकडून याप्रकरणाचा तपास सुरू करण्यात आला आहे. तसंच, छत्रपती संभाजीनगर शहर पोलिसांच्या आर्थिक गणेश शाखेनं आता याप्रकरणी चौकशीसाठी ड्रायव्हर जावेद रसूल याला बोलावल्याची माहिती आहे. तसंच याविषयी आता आर्थिक गणेश शाखेनं रसूल यांना इन्कम टॅक्स रिटर्नच्या प्रती, उत्पन्न यांसह गिफ्ट डीड याबाबतची माहिती देण्याच्या स्पष्ट सूचना केल्या आहेत.
ड्रायव्हर बनला जमीनदार! खासदार संदिपान भूमरेंच्या अडचणींत वाढ,आर्थिक गुन्हे शाखेकडून चौकशी
याबाबत शिवसेनेचे आमदार विलास भुमरे यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.ते म्हणाले, जावेद रसूल हे आमचे ड्रायव्हर आहेत. परंतु, त्यांच्या वैयक्तिक जीवनाशी माझा कुठलाही संबंध नाही, शहरातील जागा गिफ्ट दीड ज्यांना देण्यात आल्याची माहिती आहे. आमदार भुमरेंच्या ड्रायव्हरला जमीन भेट म्हणून दिलेल्या जंग कुटुंबाकडे निजामकालीन व्यवस्थेमध्ये महत्त्वाची जबाबदारी होती. जंग कुटुंबाला निजामसंस्थानच्या कार्यकाळात एक प्रमुख कुलीन कुटुंब म्हणून ओळखलं जात असत. आता सालार जंग वंशज मीर मजहर अली खान आणि त्यांच्या सहा नातेवाईकांनी स्वाक्षरी केलेल्या ‘हिबानामा’ कराराची चौकशी सुरू करण्यात आली आहे.
याप्रकरणी परभणीतील वकील मुजाहीद खान यांच्या तक्रारीवरून छत्रपती संभाजीनगर पोलिसांनी चौकशी सुरु केली आहे. माजी मंत्री आणि विद्यमान शिवसेना खासदाराच्या चालकाने 150 कोटींची जमीन बक्षीसपत्राद्वारे मिळवली आहे. जवळपास 12 एकर जमीन संभाजीनगर शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी आहे. संबंधित जमीन संदिपान भूमरे आणि त्यांच्या आमदार मुलाने चालकाच्या नावावर खरेदी केल्याचा आरोप वकिलाची मुजाहीत खान यांनी केला आहे. रक्ताच्या नात्यातील व्यक्तीने हिबानामा केल्यास तो कायदेशीररित्या वैध ठरतो. मात्र सालारजंगचे वंशज आणि भुमरे यांचा चालक यांचा काहीही संबंध नाही. शिवाय ते इस्लामच्या दोन वेगवेगळ्या पंथांचे आहेत, असंही वकील मुजाहित खान यांनी सांगितलं.