Download App

विधवांना काय म्हणायचे? मंत्री लोढा यांनी सुचवले गंगा भगिरथी

  • Written By: Last Updated:

Widow Women Get A New Identity : समाजातील उपेक्षित घटकांस विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्याकरिता केंद्र व राज्य शासनातर्फे अनेक उपक्रम राबविले जाताआहेत. या उपक्रमाच्या माध्यमातून समाजातील उपेक्षित घटकांना न्याय व त्याची प्रगती घडून आणण्याचा प्रयत्न केला जातो.

पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी अपंगांना अपंग न म्हणता दिव्यांग हे नवा दिल. केंद्र सरकारच्या या कल्पनेमुळे दिव्यांग बांधवांना समाजामध्ये मानाचे स्थान मिळाले आहे. तसेच त्यांच्याकडे समाजाचा पाहण्याचा दृष्टिकोनातं बदल झाले आहेत.

यामुळे देशातील अपंग बाधांना आता एक नवी ओळख मिळाली आहे. तसेच ते देखील आता समाजाचा एक घटक बनले आहेत. जेव्हा त्यांना अपंग म्हणून संबोधले जायचे तेव्हा त्यांना कमी पणा वाटायचं आणि समाजाचा देखील त्यांच्या कसे पाहण्याचा दृष्टिकोन तुच्छतेचा असायचा.

पाटलांची औलाद, 175 खोक्यांची जमीन विस्काटून टाकली; शहाजीबापूंचे खोक्यांवरून खणखणीत उत्तर 

केंद्र सरकारने जसे अपंगांना दिव्यांग नाव दिले याच धर्तीवर महाराष्ट्रात देखील विधवांना नवीन ओळख मिळून देण्याच्या हालचाली सुरु झाल्या आहेत. विधवा ऐवजी गंगा भगीरथी हा शब्द वापरण्याबाबत महिला व बालविकास मंत्री मंगलप्रभात लोंढा यांनी राज्याच्या मुख्य सचिवांना पत्र लिहून परिपूर्ण प्रस्ताव तयार करून चर्चा करण्यास सांगितली आहे.

आता राज्यातील विधवा महिलांना नवी ओळख मिळणार आहे. त्यादेखील आता समाजाच्या मुख्य प्रवाहात येतील तसेच समाजामध्ये मानाचे स्थान मिळेल. तसेच त्यांच्याकडे समाजाचा पाहण्याचा दृष्टिकोन देखील बदलेल. आणि त्या समाजाच्या मुख्य प्रवाहात येतील.

Tags

follow us