Download App

मोठी बातमी! संगमनेरमध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सभेपुर्वी कार्यकर्त्यांच्या गोंधळ

संगमनेरमध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सभेपुर्वी कार्यकर्त्यांच्या गोंधळ झाला आहे. या घटनेमुळं वातावरण चिघळल आहे.

  • Written By: Last Updated:

DCM Eknath Shinde In Sangamner : संगमनेरमध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सभेपुर्वी कार्यकर्त्यांमध्ये गोंधळ झाला आहे. कार्यकर्त्यांनी स्टेजजवळ गोंधळ केल्याने पोलिसांना कार्यकर्त्यांवर लाठीचार्च करावा लागला. (Sangamner) तसंच, या गोंधळामुळे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या रॅलीदरम्यान पोलिसांचे नियोजन कोलमडलं.

अमोल खताळ हा सर्वसामान्य कार्यकर्ता, तुम्ही त्याला आमदार बनवलं. तो संधीचं सोनं करणारा असून त्याने 40 वर्षांची मक्तेदारी उथलथवली असं सांगत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी संगमनेरवासियांचे आभार मानले. अमोल खताळ हा जायंट किलर नसून त्याला निवडून देणारे तुम्ही मतदार जायंट किलर आहात असंही एकनाथ शिंदे म्हणाले. काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यांचा पराभव करुन शिवसेनेचे अमोल खताळ हे निवडून आले. त्यानिमित्त मतदारांचे आभार मानण्यासाठी एकनाथ शिंदे हे संगमनेरमध्ये आले होते. त्यावेळी त्यांनी बाळासाहेब थोरात यांच्यावर टीका केली.

एकनाथ शिंदे म्हणाले की, “हेलिकॉप्टरमधून तुमच्यापर्यंत यायला तीन तास लागले. इथे संगमनेरला समुद्र नाही, पण समोर जनसागर लोटला आहे. भगवं वादळ आज इथे दिसत आहे. इथे सगळे स्वयंस्फूर्तीने आले आहेत, कोणाला भाड्याने आणलेल नाही. अमोल खताळ हा जायंट किलर ठरला, मात्र इथल्या मतदारांनी जो चमत्कार घडवला त्यामुळे खरे जायंट किलर तुम्ही मतदार आहात. विधानसभा निवडणुकीत तुम्ही चमत्कार घडवला आणि 40 वर्षांची मक्तेदारी उलथवून टाकली. त्यामुळेच मी तुमचं दर्शन घ्यायला इथे आलो आहे, तुमच्यासमोर नतमस्तक व्हायला आलो आहे.

आनंदाची बातमी! गणेशोत्सवासाठी गावी जाणाऱ्या चाकरमान्यांना टोलमाफी; DCM एकनाथ शिंदेंचा निर्णय

जे खबऱ्या, खेळणं म्हणत होते, त्यांच्या हातात आता आपण खुळखुळा दिलाय खेळण्यासाठी. अमोल काम करत राहील, तुम्ही खेळत रहा. खबर देण्याचं काम अमोल खताळ करेल. काम नसल्यावर तुम्ही खबरबात घेत रहा असा टोला एकनाथ शिंदे यांनी बाळासाहेब थोरात यांना लगावला. तसच, अमोल खताळ संगमनेरचा मात्र दिल्लीत देखील माहीत झाला आहे. अमोलला संजय गांधी योजनेचे पद मिळालं आणि त्याने निराधारांना आधार दिला. म्हणून संधीच सोनं करणारा आमदार कोण तर अमोल खताळ अशा शब्दात एकनाथ शिंदे यांनी कौतुक केलं.

बाळासाहेब थोरात यांच्यावर टीका करताना एकनाथ शिंदे म्हणाले की, “संगमनेरमध्ये साखर कारखाना, दूध संघ, सगळ्या संस्था त्यांच्याच. दूध पण माझा, चहा पण माझा, बिस्कीट पण माझं, मग जनतेचा काय? म्हणून तुम्ही एका सर्वसामान्य कार्यकर्त्याला निवडून दिलं. 440 चा झटका विरोधकांना दिला, तरी ते त्यातून बाहेर येत नाही. अजूनही व्होट चोरी झाली म्हणतात. मात्र गेल्या 50-60 वर्षात यांनी काय काय चोरलं, कितीतरी भ्रष्टाचार यांनी केले. 2014 पूर्वी तर भ्रष्टाचाराची रांगच होती. त्यांचा मेंदू आणि स्वाभिमान, अभिमान देखील चोरीला गेला आहे

follow us