कुठे थंडी कुठे पाऊस! राज्यातील थंडीची लाट ओसणार, हवामान विभागाचा अंदाज काय?

IMD ने थंडीचा कडाका कमी होऊन 27 जानेवारीपासून अनेक भागांमध्ये तापमान वाढेल. तर सकाळी हलक्या धुक्यासह काही ठिकाणी तुरळक सरींची शक्यता वर्तवली

IMD

IMD

Where is it cold, where is it raining IMD Rain Forcast for Maharashtra : गेल्या काही दिवसांपूर्वी कमी झालेली राज्यातील थंडी पुन्हा वाढली आहे. मात्र आता थंडीचा कडाका कमी होण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. 27 जानेवारी रोजी राज्यातील अनेक भागांमध्ये तापमान वाढेल. तर सकाळी हलक्या धुक्यासह काही ठिकाणी तुरळक सरी कोसळण्याची शक्यता देखील वर्तवण्यात आली आहे

हवामान विभागाचा अंदाज नेमका काय?

आयएमडी म्हणजेच भारतीय हवामान विभागाच्या ताज्या अंदाजानुसार आज 27 जानेवारी रोजी राज्यातील मुंबई, नागपूरसह विविध भागात दिवसभर उष्णता वाढण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर सकाळी काही ठिकाणी हलक्या ते तुरळक पावसाची शक्यता आहे. दरम्यान पुढील दोन ते तीन दिवस तापमान स्थिर राहील मात्र हळूहळू उष्णता वाढणार आहे.

प्रजासत्ताक दिनाच्या परेडमध्ये राहुल गांधींना तिसऱ्या रांगेत बसवलं; काँग्रेसकडून तीव्र प्रतिक्रिया

यामध्ये मुंबई, ठाणे, नवी मुंबई, रायगड, रत्नागिरी व सिंधुदुर्ग या ठिकाणी सकाळी हलकं धुकं दुपारनंतर अंशतः ढगाळ वातावरण तर काही ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस पडू शकतो. असा अंदाज आयएमडी मुंबईने दिला आहे. तर पश्चिम महाराष्ट्रामध्ये पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर या परिसरात मात्र हवामान कोरडे राहून सकाळी थंडी तर दुपारी स्वच्छ सूर्यप्रकाशामुळे उष्णता वाढेल.

लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी; महिन्याचे 1500 वरून 2100 रुपये होणार?

विदर्भातील नागपूर, अमरावती, अकोला, यवतमाळ, चंद्रपूर च्या गडचिरोली या ठिकाणी सकाळी सोमवार व दुपारी उकाडा तसेच काही ठिकाणी ढगाळ वातावरणामुळे तुरळक सरी कोसळण्याची शक्यता आहे.

Exit mobile version