Uddhav Thackeray indirectly targeted Eknath Shinde without naming him : नागपूरमध्ये विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन सुरू आहे. अधिवेशनात राजकीय वातावरण चांगलंच तापलंय. त्यातच आता महाविकास आघाडीचे नेते आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे(Shivsena UBT) पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे(Uddhav Thackrey) यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे(DCM Eknath Shinde) यांच्यावर कडवी टीका केली आहे. सलग दुसऱ्या दिवशी ते अधिवेशनासाठी उपस्थित होते. माध्यमांशी बोलताना त्यांनी हे जळजळीत वक्तव्य केल्याने राजकीय(Politics) वर्तुळात याचीच चर्चा सुरू आहे. दुसऱ्या दिवशीही उद्धव ठाकरे हे सभागृहात उपस्थित राहिले होते. त्यांच्या उपस्थितीची विरोधकांमध्ये चर्चा पाहायला मिळाली.
उद्धव ठाकरे हे सभागृहात दाखल झाल्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना याबाबत विचारणा करण्यात आली. तेव्हा एकनाथ शिंदे यांनी मिश्कीलपणे उत्तर देत अरायवल म्हणजेच आगमन झाले अशी प्रतिक्रिया दिली. उद्धव ठाकरे यांच्या सभागृहातील अनुपस्थितीवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अप्रत्यक्ष टीका केली. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या याच टीकेबद्दल उद्धव ठाकरे यांना माध्यमांकडून प्रश्न विचारला गेला असता, त्यांनी अत्यंत संतप्त आणि आक्रमक अशी प्रतिक्रिया दिली आहे. एकनाथ शिंदे यांचं नाव न घेता त्यांनी अप्रत्यक्ष त्यांच्यावर टीका केली. ‘गुलामाने प्रतिक्रिया द्यायची नसते, गांढूळाणे फणा काढण्याचा प्रयत्न करायचा नसतो. हे कुणीतरी त्यांना सांगा. अशा विखारी शब्दांत त्यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर अप्रत्यक्ष टीका केली आहे.
मोठी बातमी! जनगणनेसाठी केंद्रीय मंत्रिमंडळाची बजेटला मंजुरी, किती टप्प्यात होणार अन् किती आहे खर्च?
शिवसेनेत फूट पडल्यापासून उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यातला संघर्ष संपूर्ण महाराष्ट्र पाहतोय. पक्षाबाबतची न्यायालयीन लढाई, पक्षचिन्हाची लढाई आणि एकमेकांवर सततचे आरोप प्रत्यारोप कारण हे दोन्ही नेते दिसून येत असतात. उद्धव ठाकरे यांच्या या जहरी टीकेमुळे आता हिवाळी अधिवेशनामधील राजकीय संघर्ष अजून वाढणार आहे. उद्धव ठाकरे यांच्या या टीकेनंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांच्या पक्षाकडून या टीकेला प्रत्युत्तर कसे दिले जाते हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
