मोदी अन् योगींनी केलं अभिनंदन; अहिल्यानगरच्या महेश यांनी केलेलं ‘दंडक्रम’ पारायण नेमकं काय?

आतापर्यंत जगात फक्त दोनदा दंडक्रम पारायण झाले आहे. 200 वर्षांपूर्वी वेदमूर्ती नारायण शास्त्री देव यांनी नाशिकमध्ये दंडक्रम पारायण केले होते.

मोदी अन् योगींनी केलं अभिनंदन; अहिल्यानगरच्या महेशनं केलेलं 'दंडक्रम' पारायण नेमकं काय?

मोदी अन् योगींनी केलं अभिनंदन; अहिल्यानगरच्या महेशनं केलेलं 'दंडक्रम' पारायण नेमकं काय?

What is Dandakrama Parayanam : महाराष्ट्रातील अहिल्यानगर जिल्ह्यातील 19 वर्षीय वेदमुर्ती देवव्रत रेखे यांचं पंतप्रधान नरेंद्र मोदींसह (Narendra Modi) योगी आदित्यनाथ यांनी भरभरून कौतुक केलं आहे. वेदमुर्ती देवव्रत रेखे यांनी काशीमध्ये मागील काही दिवसांत एक आध्यात्मिक साधना पूर्ण केली आहे. शुक्ल यजुर्वेदाच्या मध्यनंदिनी शाखेतील 2000 मंत्रांचा समावेश असलेले दंडक्रम पारायण देवव्रत रेखे यांनी पूर्ण केलं आहे. त्यामुळे सध्या त्यांची मोठी चर्चा सुरू आहे. नेमकं हे दंडक्रम पारायण काय आहे? याचे पठण करणे कठीण का मानले जाते त्याबद्दल जाणून घेऊया…

मोदी सरकारचा मोठा निर्णय! आता दर 6 तासांनी ऑटो-लॉग आउट होणार व्हॉट्सअ‍ॅप; नवा नियम काय?

अवघ्या 50 दिवसात केलं पारायण पूर्ण

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केलेल्या कौतुकानंतर वेदमूर्ती देवव्रत महेश रेखे देशासह जगभरात चर्चेत आले आहेत. गेल्या अनेक दिवसांपासून वाराणसीच्या म्हणजेच काशीच्या भूमीत 19 वर्षीय वेदमूर्ती देवव्रत महेश रेखे यांच्याबद्दल बरीच चर्चा होती. काशीच्या भूमीत शुक्ल यजुर्वेदाच्या मध्यनंदिनी शाखेच्या 2000 मंत्रांचे दंडक्रम पठण सुरू होते, जे रेखे यांनी अवघ्या 50 दिवसांत कोणत्याही व्यत्ययाशिवाय पूर्ण केले.

कोण आहेत वेदमूर्ती देवव्रत महेश रेखे?

दंडक्रम पारायण अत्यंत कठीण मानले जाते. वेदमूर्ती देवव्रत महेश रेखे हे महाराष्ट्रातील अहिल्यानगर येथील रहिवासी आहेत. वेदमूर्ती ब्रह्मश्री महेश चंद्रकांत रेखे हे त्यांचे वडील. वेदमूर्ती महेश रेखे हे वाराणसीच्या सांगवेद विद्यालयाचा विद्यार्थी आहेत.

200 वर्षांनंतर करण्यात आले पठण; जगात आतापर्यंत फक्त दोनदाच असे घडले

आतापर्यंत जगात फक्त दोनदा दंडक्रम पारायण झाले आहे. 200 वर्षांपूर्वी वेदमूर्ती नारायण शास्त्री देव यांनी नाशिकमध्ये दंडक्रम पारायण केले होते. यानंतर वेदमूर्ती देवव्रत महेश रेखे यांनी नुकतेच काशी येथे दंडक्रम पारायण पूर्ण केले. वेदमूर्ती देवव्रत महेश रेखे यांनी 2 ऑक्टोबर ते 30 नोव्हेंबर दरम्यान वल्लभराम शालिग्राम संगवेद विद्यालय, रामघाट, काशी येथे दंडक्रम पारायण केले. जे गेल्या शनिवारी पूर्ण झाले. त्यानंतर शृंगेरी शंकराचार्यांनी त्यांना आशीर्वाद म्हणून सोन्याचे ब्रेसलेट व रु. 101116 आणि सन्मान चिन्ह म्हणून देण्यात आले.

दंडक्रम पारायण म्हणजे काय?

शुक्ल यजुर्वेदाच्या मध्यनदिनी शाखेतील सुमारे 2000 मंत्रांना दंडक्रम पारायण म्हणतात. हे एक कठीण पठण आहे, ज्यासाठी या सर्व मंत्रांचे स्मरण आणि पठण आवश्यक आहे. शृंगेरी मठानुसार, दंडक्रम हा त्याच्या जटिल स्वर नमुन्यांमुळे आणि कठीण ध्वन्यात्मक क्रमपरिवर्तनांमुळे वैदिक पठणाचा मुकुट रत्न मानले जाते. दंडक्रम पारायणात, श्लोक सरळ आणि मागे दोन्ही प्रकारे एका अद्वितीय शैलीत पठण केले जातात.
वेद पठणाचे आठ प्रकार आहेत. त्यापैकी एक दंडक्रम पारायण आहे, जे सर्वात कठीण मानले जाते. यामध्ये टप्प्याटप्प्याने प्रगती होते असे दिल्लीतील प्राच्य विद्या प्रतिष्ठानचे संचालक जीत राम भट्ट सांगतात.

भारतात पहिले गृहकर्ज कोणी घेतले? कर्ज म्हणून किती मिळाली होती रक्कम? वाचा रंजक माहिती

याबाबत त्यांनी एक उदाहरण दिले आहे. ते म्हणतात की, एकामागून एक श्लोक पूर्ण केल्यानंतर, पुढे जाण्यासाठी पहिले आणि दुसरे श्लोक पठण केले जाते. त्यानंतर पुढे जाण्यासाठी पुन्हा पहिला आणि दुसऱ्या पदाचे श्लोकाचे पठण केले जाते. याच क्रमाने एक दोन आणि तीन पदाचे श्लोक म्हटल्यानंतर पुढे जाण्यासाठी तिसरे, दुसरे आणि पहिल्या पदातील श्लोक म्हणत दंडक्रम पारायण केले जाते. संपूर्ण पारायणात 1 कोटींहून अधिक शब्द पठण केले जाते.

Exit mobile version