Download App

नागपुरमध्ये आंदोलक आक्रमक, प्रशांत कोरटकरचा ‘आका’ कोण? थेट पोलिसांना विचारला सवाल

प्रशांत कोरटकरच्या घराबाहेर जमलेल्या आंदोलकांनी पोलिसांना प्रश्न उपस्थित करत म्हटलं की, मराठा समाज नव्हे तर अख्खा महाराष्ट्र

  • Written By: Last Updated:

Indrajeet Sawant : छत्रपती संभाजी महाराज आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी आक्षेपार्ह विधान करणाऱ्या प्रशांत कोरटकरचा ‘आका’ कोण? असा प्रश्न नागपूरमध्ये आंदोलकांनी उपस्थित केला आहे. (Indrajeet Sawant ) नागपूमध्ये कोरटकरच्या घरासमोर शिवप्रेमींनी आंदोलन सुरु केलं आहे. पोलिसांचा फौजफाटा घटनास्थळी असून आंदोलकांनी पोलिसांच्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित केले आहेत.

Audio : इतिहास संशोधक इंद्रजीत सावंतांना धमकी; फडणवीसांचे नाव घेत जिवे मारण्याचा इशारा

प्रशांत कोरटकरच्या घराबाहेर जमलेल्या आंदोलकांनी पोलिसांना प्रश्न उपस्थित करत म्हटलं की, मराठा समाज नव्हे तर अख्खा महाराष्ट्र आणि देश संतप्त आहे. कोरटकरच्या मागच्या आका कोण? असा प्रश्न उपस्थित करण्यात आला.

पोलिससांनी कोरटकरला अटक करण्याची शाश्वती दिली पण एवढी यंत्रणा असताना एका चिल्लर माणसाला पकडू शकत नाहीत? प्रशांत कोरटकरचा सीडीआर चेक करा, काल सकाळी त्याने बाईट दिला आहे, माझा नंबर आणि आयडी दहा ते पंधरा वेळा हॅक झाला आहे. मग तो सतर्क का झालेला नव्हता.” असा संताप आंदोलकांनी व्यक्त केला.

follow us