Audio : इतिहास संशोधक इंद्रजीत सावंतांना धमकी; फडणवीसांचे नाव घेत जिवे मारण्याचा इशारा

Audio : इतिहास संशोधक इंद्रजीत सावंतांना धमकी; फडणवीसांचे नाव घेत जिवे मारण्याचा इशारा

Indrajit Sawant Get Threat Call for opposing Chhaava Movie : इतिहास संशोधक इंद्रजीत सावंत यांना (Indrajit Sawant) धमकी मिळाल्याचं समोर आलंय. त्यांना धमकीचा फोन आला होता. त्यांनी छत्रपती संभाजी महाराज यांच्यावर बनलेल्या ‘छावा’ चित्रपटावर ( Chhaava Movie) बोलताना ब्राम्हण द्वेषी विचार मांडल्याचं आरोप केला (Chhaava) जातोय. छत्रपती संभाजीराजे यांना ब्राम्हणवादी लोकांनी पकडून दिलं होतं, असं वक्तव्य इंद्रजीत सावंत यांनी काही दिवसांपूर्वी केलं होतं.

…तर पाण्याचा घोटही घेणार नाहीत; मस्साजोगच्या ग्रामस्थांचं पाऊल, आजपासून अन्नत्याग आंदोलन

इतिहास संशोधक इंद्रजीत सावंत यांचे विचार ब्राम्हण द्वेषी आहेत, असा ठपका ठेवत त्यांना धमकी मिळाली होती. तर खुद्द इंद्रजीत सावंत यांनीच या धमकीबाबत साडेसहा मिनिटांचा ऑडिओ फेसबुक या सोशल मिडिया प्लॅटफॉर्मवर शेअर (Entertainment News) केला. काही वेळीतच तो मोठ्या प्रमाणावर व्हायरल झालाय. धक्कादायक बाब म्हणजे इंद्रजीत सावंत यांना धमकावताना थेट मुख्यमंत्र्‍यांचं नाव घेण्यात आलंय. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं नाव घेऊन प्रशांत कोरटकर नावाच्या एका व्यक्तीने ‘परशुरामी ब्राम्हण’ धमकी देत आहे, असं इंद्रजीत सावंत यांनी त्यांच्या शेअर केलेल्या फेसबुक पोस्टमध्ये म्हटलंय.

इंद्रजीत सावंत यांच्य फेसबुक पोस्टमध्ये नेमकं काय?
सोशल मीडियावर शेअर केलेल्या पोस्टमध्ये इंद्रजीत सावंत यांनी म्हटलंय की, मुख्यमंत्र्‍यांचं नाव घेऊन प्रशांत कोरटकर नावाचा एक परशूरामी ब्राम्हण धमक्या देतोय. अशा धमक्या नवीन नाहीत. परंतु या व्यक्तीचे छत्रपती शिवाजी महाराजांबद्दलचे विचार किती घाणरडे आहेत. त्याच्या पोटात शिवरांयाबद्दल किती विष भरलेले आहे, हे झोपलेल्या मराठा बहुजनांना समजावं म्हणून मी रेकॉर्डिंग व्हायरल करतोय. शिवरायांचा मावळा कोरटकर नावाच्या नागपूरच्या भिक्षुकाला घाबरत नाही.

मोठी बातमी! पश्चिम बंगालमध्ये जाणवले भूकंपाचे धक्के; बंगालच्या उपसागरात घटनेचा केंद्रबिंदू

इंद्रजीत सावंत यांचं वक्तव्य काय?
छत्रपती संभाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित ‘छावा’ सिनेमा 14 फेब्रुवारी रोजी प्रदर्शित झाला. छावा सिनेमाची सर्वत्र चर्चा सुरु आहे. असे असताना इतिहास संशोधक इंद्रजीत सावंत यांनी देखील छावा चित्रपटाविषयी भाष्य केलं. छावा सिनेमामध्ये इतिहासाचे वेगळ्या पद्धतीनं दर्शन झालंय, असं इंद्रजीत सावंत यांनी स्पष्ट केलंय. ते म्हणाले की, छावा सिनेमामध्ये सोयरा बाईसाहेब यांना खलनायक दाखवलं गेलंय. अण्णाजी दत्तो हे खरे खलनायक होते. विकीपिडीयावर लिहिला जाणार खोटा इतिहास काढून टाकायला हवा असं देखील इंद्रजीत सावंत म्हणाले होते.

इंद्रजीत सावंत नावाच्या व्यक्तीला ओळखत नाही

प्रशांत कोरटकर यांनी हे आरोप फेटाळून लावलेत. मी इंद्रजीत सावंत नावाच्या व्यक्तीला ओळखत नाही. कोणीतरी खोडसाळपणा केलाय. याविरोधात मी नागपूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करणार आहे, असं कोरटकर यांनी म्हटलंय. कोणतीही शहानिशा न करता माझं नाव वापरणं चुकीचं आहे. याविरोधात मी अब्रुनुकसानीची तक्रार दाखल करणार आहे. सावंत यांनी मला फोन करून विचारायला हवं होतं, की हा आवाज तुमचा आहे का? सोशल मीडियाचा वापर करून धमकी देण्यात आल्याचं कोरटकर यांनी म्हटलंय.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube