VIDEO : ‘छावा’ बघून ढसाढसा रडले…प्रेक्षकांनी न्याय दिलाय – ओंकार महाजन

VIDEO : ‘छावा’ बघून ढसाढसा रडले…प्रेक्षकांनी न्याय दिलाय – ओंकार महाजन

Chhaava Writer Omkar Mahajan News : छत्रपती संभाजी महाराजांच्या जीवनावर आधारित छावा चित्रपट 14 फेब्रुवारीला रिलीज झाला. तेव्हापासून प्रेक्षकांनी त्याला डोक्यावरच घेतलंय. लहान मुलांपासून वृद्धांपर्यंत सर्वजण सिनेमा बघून आवाक झालेत. यावर लेट्सअप मराठीसोबत बोलताना छावा चित्रपटाचे लेखक ओंकार महाजन (Omkar Mahajan) म्हणाले की, प्रेक्षक छावा (Chhaava) चित्रपट पाहून ढसाढसा रडत आहेत. या भावना शब्दांत व्यक्त करणं अतिशय अवघड जातंय. मी सुद्धा रिलीज होण्याअगोदर सिनेमा पाहिलाय. पण प्रेक्षकांसोबत सिनेमा पाहून त्यांच्या प्रतिक्रिया बघणं हा अनुभव खूपच वेगळा (Chhaava Movie) आहे. जे काही आम्ही टिमनं ठरवलं होतं, त्याला न्याय प्रेक्षकांनी दिलाय. आमचा प्रयत्न सार्थकी नेलाय. लहान मुलांपासून ज्येष्ठ नागरिकांना देखील सिनेमा आवडतोय.

जेव्हा एखादी कलाकृती समाजातील प्रत्येक वयोगटाला भावते ना, तेव्हा मला असं वाटतं की (Entertainment News) त्या कलाकृतीने समाजाला काहीतरी संबोधित केलंय. काही कलाकृती विशेष्ट वयोगटाला आवडतात, असं होतं. पण छावाच्या बाबतीत तसं नाही झालं, असं छावा चित्रपटाचे लेखक ओंकार महाजन यांनी म्हटलंय.

VIDEO : ‘म्हणूनच… विकी सुपरस्टार’ छावाच्या लेखकांनी सांगितला तो खास अनुभव

माझ्या आयुष्यातील पहिली बॉलीवूडमधील सुरूवात ही राकेश सरांसोबत झाली. अक्षय सरांसोबत सरफिरामध्ये काम करण्याचा अनुभव सुद्धा स्पेशल होता. पण स्टार लोकांकडून देखील रिस्पेक्ट मिळणं देखील खुप मोठं आहे. ही सगळी माणसं आपल्याला विचारतात, त्यामुळं आत्मविश्वास वाढतो. आपला ट्रॅक बरा चालु आहे. आईला बघताना वाटतंय की, इतक्या वर्षांनी यशाची मोहोर उमटली आहे. ते सगळे माझे बॅकबोन आहेत. आता आई प्रचंड खूश आहे. ही छावाच्या राईटरची आई, हे सगळं तिच्यासाठी खूप स्पेशल असल्याचं ओंकार महाजन यांनी म्हटलंय.

माझ्या आईने सगळ्यांत उशिरा सिनेमा पाहिलाय. तर जगभरातल्या प्रेक्षकांसारखीच तिची प्रतिक्रिया होती. कारण तिने कादंबरी अगोदर वाचलेली आहे. तिची प्रतिक्रिया माझ्यासाठी अत्यंत महत्वाची होती, असं ओंकार महाजन यांनी सांगितलंय. या टप्प्यावर शिर्के कुटुंबाच्या वादावर बोलताना महाजन म्हणाले की, आमचं आपापसात देखील काही बोलणं झालंय. सिनेमाचा डिस्क्लेमर देखील आम्ही दिलाय. सावंत सरांची छावा कादंबरी जगप्रसिद्ध आहे. तिचे राइट्स आमच्याकडे आहे. आम्ही इतिहासाचा अभ्यास केलाय. जर तुम्ही चित्रपट पाहिला तर आम्ही राजे शिर्के हे आडनावचं चित्रपटात घेतलेलं नाहीये.

मोठी बातमी : मोहोळांच्या माणसाला मारणं अंगलट; पोलिसांनी आवळल्या गजा मारणेच्या मुसक्या

कोणत्याही कलाकृतीचे वाद झाले तर कधी-कधी या वादाचा देखील आपण काय कामं करतो, ते काम किती लोकांना आवडतं ना, ते कामाला चांगलं म्हणत आहे किंवा वाईट म्हणत आहे, ते माझ्यासाठी महत्वाचं आहे. कॉन्ट्रावर्सी ही माझ्यासाठी अतिशय छोटी गोष्ट आहे. प्रेक्षकांनी मात्र शिक्कामोर्तब केलंय. प्रेक्षकवर्गाने आमच्या कलाकृतीला कौल दिलाय. त्यापेक्षा मोठा कौल काय असु शकतो, असा सवाल त्यांनी विचारलाय. आई, वडिल अन् अनुजा, विकास कदम, अमित, राजन सोहणी, विशाल आणि बरेचजण या यशामागे आहे. माझ्या आयुष्यात माझ्या फॅमिलीनंतर माझा मित्रपरिवार आहेत, असं ओंकार महाजन यांनी सांगितलंय.

मी आता दोन फिल्म लिहितोय. हे दोन्ही सिनेमा हिंदी आहेत. दिग्दर्शक म्हणून माझं स्वप्न आजही कायम आहे, असं देखील ओंकार महाजन यांनी म्हटलंय.

 

follow us
  • fb
  • instagram
  • youtube