मोठी बातमी : मोहोळांच्या माणसाला मारणं अंगलट; पोलिसांनी आवळल्या गजा मारणेच्या मुसक्या

Gaja Marane Arrested : पुण्यात बुधवारी केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ (Muralidhar Mohol) यांच्या कार्यकर्त्याला गजा मारणेच्या (Gaja Marane) गुंडांकडून मारहाण करण्यात आली होती. याप्रकरणी तीन आरोपींना अटक करण्यात आली होती. दरम्यान, आता कोथरूड पोलिसांनी(Kothrud Police) गजा मारणेच्या देखील मुसक्या आवळ्या आहेत. तसेच मुख्य आरोपी बाब्या पवारला (Babya Pawar) देखील कोथरूड पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.
‘पदाच्या बदल्यात मर्सिडीज’ हे विधान मुर्खपणाचे; पवार गोऱ्हेंवर भडकले अन् राऊतांना पाठींबा
कोथरूड भागात बुधवारी शिवजयंतीच्या दिवशी दुचाकीस्वार अभियंता देवेंद्र जोग या तरुणाला कुख्यात गुंड गजा मराणेच्या गुंडानी मारहाण केल्याची घटना घडली होती. शिवजयंतीनिमित्त काढण्यात आलेल्या मिरवणुकीतून दुचाकी काढण्याचा प्रयत्न करत असताना वाद झाला आणि देवेंद्र जोग या तरुणाला मारहाण करण्यात आली होती. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून आतापर्यंत तीन जणांना ताब्यात घेतले आहे.
मारहाणीची घटना झाल्यानंतर पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी तातडीने कारवाई करत आरोपींना अटक करण्याचे आदेश दिले. त्यानुसार, कोथरूड पोलिसांनी मारणे टोळीतील तीन गुंडांना अटक केली आहे. ओम तीर्थराम धर्मजिज्ञासू (३५), किरण कोंडिबा पडवळ (३१) आणि अमोल विनायक तापकीर (३५, सर्व रा. शास्त्री नगर, कोथरूड) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.
ब्लॉकबस्टर सिनेमा ‘दिल तो पागल है’ 28 फेब्रुवारीला पुन्हा होणार रिलीज
दरम्यान, आता या प्रकरणात मारणे टोळीचा म्होरक्या गजा मारणेला अखेर अटक करण्यात आली. तसेच मुख्य आरोपी बाब्या पवारला देखील कोथरूड पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. गजा मारणेची संपूर्ण चौकशी झाल्यानंतर उद्या (मंगळवारी) त्याला कोर्टात हजर केलं जाईल, अशी माहिती पोलिसांनी दिली. तर इतर आरोपींचांही कोथरुड पोलिसांकडून शोध सुरु आहे.
मारणे टोळीवर मोक्कांतर्गत कारवाई
जोगवर हल्ला केल्या प्रकरणी गजा मारणेसह त्याच्या टोळी विरोधात मोक्का अंतर्गत देखील कारवाई करण्यात आली आहे. ही कारवाई मारणे टोळीसाठी मोठा धक्का समजला जात आहे. कायद्याचे उल्लंघन करत नागरिकांमध्ये दहशत निर्माण करणाऱ्या टोळ्यांना नेस्तनाबूत करण्याची पुणे पोलिसांनी भूमिका घेतली आहे.
मुरलीधर मोहोळ यांनी दिला होता आदेश
सुशिक्षित तरुणाला विनाकारण मारहाण करून दहशत निर्माण करणाऱ्यांना सोडू नका, एवढंच काय तर त्यांना वाचवण्यासाठी येणाऱ्याविरोधात देखील कडक कारवाई करावी, असे आदेश मोहोळ यांनी दिले होते. सोशल मीडियावर अनेकांचे रिल्स, फोटो व्हायरल होत असतांना पुणे पोलिस डोळे झाकून बसलेत का? पोलीस या संदर्भात आत्मपरीक्षण करावं, अशी अपेक्षाही मोहोळांनी व्यक्त केली होती.