‘पदाच्या बदल्यात मर्सिडीज’ हे विधान मूर्खपणाचे; पवार गोऱ्हेंवर भडकले अन् राऊतांना पाठींबा

Sharad Pawar on Neelam Gorhe statement at Akhil Bhartiy Marathi Sahitya sammelan : दिल्लीत झालेल्या अखिल भारतीय साहित्य संमेलनात (Akhil Bhartiy Marathi Sahitya sammelan) शिवसेना नेत्या नीलम गोऱ्हेंनी ( ‘असे घडलो आम्ही’ या परिसंवादात बोलत असताना उद्धव ठाकरेंवर गंभीर आरोप केले. त्यावर संमेलनाचे स्वागताध्यक्ष असलेले शरद पवार यांनी देखील पत्रकार परिषदेत फटकारले आहे.
ब्लॉकबस्टर सिनेमा ‘दिल तो पागल है’ 28 फेब्रुवारीला पुन्हा होणार रिलीज
यावेळी बोलताना पवार म्हणाले की, दिल्लीत झालेलं दुसरं मराठी साहित्य संमेलन यशस्वी झालं. त्यावेळी जवाहरलाल नेहरू यांनी त्यावेळी त्यातच उद्घाटन केलं होतं तर स्वागताध्यक्ष गाडगीळ होते. तर यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संमेलनाचं उद्घाटन केलं, तर स्वागताध्यक्ष मी होतो. तसेच साहित्य संमेलन म्हटलं की वाद असतोच पण निलम गोऱ्हे यांनी अशा प्रकारच भाष्य साहित्य संमेलनात करण्याची आवश्यकता नव्हती. त्यामुळे राऊत त्यांना बोलले ते योग्यच आहे. असं म्हणत पवारांनी नीलम गोऱ्हेंना फटकारले तर राऊतांना समर्थनही दिलं.
VIDEO : ‘म्हणूनच… विकी सुपरस्टार’ छावाच्या लेखकांनी सांगितला तो खास अनुभव
पुढे ते म्हणाले की, त्यांनी काढलेला गाडीचा विषय देखील योग्य नव्हता. त्यामुळे त्यांचं हे विधान मुर्खपणाचं होतं. त्या वेळा आमदार कशा झाल्या हे राज्याला माहिती आहे. त्या आंबेडकरांच्या पक्षातून राजकारणात आल्या. त्यानंतर त्या राष्ट्रवादी कॉंग्रेस, शिवसेना आणि आता शिंदे गटात गेल्यात त्यामुळे त्यांना सर्व पक्षांचा अनुभव आहे. त्यामुळे त्यांनी असं भाष्य करणं योग्य नव्हतं. त्यामुळे राऊत जे म्हणतात ते योग्य आहे.
मोठी बातमी : मोहोळांच्या माणसाला मारणं अंगलट; पोलिसांनी आवळल्या गजा मारणेच्या मुसक्या
काय म्हणाल्या होत्या निलम गोऱ्हे?
नवी दिल्लीत अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन सुरू आहे. या संमेलनात असे घडलो आम्ही या कार्यक्रमात बोलताना नीलम गोऱ्हे यांनी हे वक्तव्य केले आहे. त्यांच्या या वक्तव्याने नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता व्यक्त होत आहे. गोऱ्हे पुढे म्हणाल्या, कार्यकर्त्यांना कमी समजण्याचं काहीच कारण नाही. नव्या मॅनेजरचा गल्ला गोळा करण्याचा प्रयत्न तेव्हापासून सुरू होता का असा प्रश्न गोऱ्हेंना विचारण्यात आला. यावर गोऱ्हे म्हणाल्या, कार्यकर्त्याला कमी समजण्याचे काहीच कारण नाही. प्रत्येक सभेला ठाण्याहून माणसे यायची आणि त्यांचीच माणसे कार्यक्रमाचे नियोजन करत होते.
आता जास्त तपशीलात जाणार नाही. उद्धव ठाकरे गटाचे फार लोकही समोर नाहीत. त्यामुळे त्यांच्या गटाचे लोक येथे असते तर मला बोललेले अधिक आवडले असते. नेत्यांना संपर्क नको असेल तर आपण तिथे नकोसे झालो आहोत असे समजावे. दोन मर्सिडीज गाड्या मिळाल्यावर एक पद असे होते असा गौप्यस्फोट डॉ. नीलम गोऱ्हे यांनी केला.