लोकसभा निवडणुकीमध्ये राज्यात महाविकास आघाडीला मोठं यश मिळालं होतं, परंतु त्यानंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीत मात्र महाविकास आघाडीचा सपाटून पराभव झाला. (BJP) महाराष्ट्रात महायुतीला मोठं यश मिळालं, तब्बल 232 जागांवर महायुतीचे उमेदवार विजयी झाले, तर महाविकास आघाडीला अवघ्या 50 जागांवर समाधान मानावं लागलं होतं. दरम्यान, राज्यात महायुतीचं सरकार येऊन आता एक वर्षाचा काळ पूर्ण झाला आहे.
या काळात महाराष्ट्राच्या जनतेचा मूड कसा आहे? जनता सरकारच्या कामगिरीवर समाधानी आहे का? महाराष्ट्राच्या जनतेची सर्वाधिक पसंती कोणत्या नेत्याला आहे? कोण राज्यातील सर्वाधिक विश्वासार्ह नेता आहे, हे यानिमित्तानं जाणून घेण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. सी व्होटर (C Voter) कडून या संदर्भात सर्व्हे करण्यात आला आहे. जाणून घेऊयात महाराष्ट्राच्या जनतेची सर्वाधिक पसंती कोणत्या नेत्याला आहे? आणि कोण राज्यातील सर्वाधिक विश्वासार्ह नेता ठरला आहे त्याबद्दल.
निवडून दिलं म्हणजे सगळे…, तपोवन वृक्षतोडीवरून सयाजी शिंदेंनी फडणवीस सरकारला सुनावलं
या सर्व्हेमध्ये सर्वात विश्वासार्ह नेता म्हणून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रथम स्थान पटकावलं आहे, राज्यातील तब्बल 35 टक्के जनतेनं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर विश्वास असल्याचं म्हटलं आहे. तर त्यानंतर दुसऱ्या क्रमाकांवर आहेत, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे 17.8 टक्के लोकांनी एकनाथ शिंदे हे सर्वाधिक विश्वासार्ह नेता असल्याचं म्हटलं आहे. यामध्ये तिसऱ्या क्रमांकावर आहेत, ते म्हणजे शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे 14. 4 टक्के लोकांनी उद्धव ठाकरे यांच्यावर विश्वास व्यक्त केला आहे.
तर चौथ्या क्रमाकांवर राष्ट्रवादी शरद पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार हे असून, 11.2 टक्के लोकांनी त्यांच्या बाजूनं कौल दिला आहे. या सर्व्हेमध्ये मनसे प्रमुख राज ठाकरे यांना 4.2 टक्के लोकांनी पसंती दर्शवली आहे. दुसरीकडे या सर्व्हेमध्ये असाही प्रश्न विचारण्यात आला होता की सध्या महाराष्ट्रातील सर्वात मोठा प्रश्न कोणता वाटतो? तर सर्वाधिक लोकांनी शेतकऱ्यांचा प्रश्न महत्त्वाचा असल्याचं म्हटलं आहे, तर दुसऱ्या क्रमांकावर वाढत असलेली बेरोजगारी हा मुद्दा आहे. तस तिसऱ्या क्रमांकावर भ्रष्टाचाराचा मुद्दा आहे.
