Shivsena Symbol Crisis : ‘धनुष्यबाण’ कोणाचा? निवडणूक आयोग लवकरच अंतिम निकाल देणार

मुंबई : आज शिवसेना निवडणूक चिन्हाच्या (Shivsena Symbol)लढाईमधील महत्त्वाचा दिवस आहे. शिवसेनेच्या (Shivsena)दोन्ही गटांचे प्रत्यक्ष युक्तिवाद संपल्यानंतर लेखी युक्तीवादासाठी आज शेवटचा दिवस आहे. गेल्या सुनावणीदरम्यान दोन्ही बाजूंनी पक्षाच्या घटनात्मक मुद्द्यांवर एकमेकांवर आरोप केलेत. त्यानंतर 30 जानेवारीपर्यंत आपलं म्हणणं मांडण्यासाठी आयोगानं मुदत दिली होती. त्यामुळं शिंदे आणि ठाकरे गटाकडून (Thackeray vs Shinde) आज निवडणूक आयोगात (Election […]

Election Commistio

Election Commistio

मुंबई : आज शिवसेना निवडणूक चिन्हाच्या (Shivsena Symbol)लढाईमधील महत्त्वाचा दिवस आहे. शिवसेनेच्या (Shivsena)दोन्ही गटांचे प्रत्यक्ष युक्तिवाद संपल्यानंतर लेखी युक्तीवादासाठी आज शेवटचा दिवस आहे. गेल्या सुनावणीदरम्यान दोन्ही बाजूंनी पक्षाच्या घटनात्मक मुद्द्यांवर एकमेकांवर आरोप केलेत. त्यानंतर 30 जानेवारीपर्यंत आपलं म्हणणं मांडण्यासाठी आयोगानं मुदत दिली होती. त्यामुळं शिंदे आणि ठाकरे गटाकडून (Thackeray vs Shinde) आज निवडणूक आयोगात (Election Commission) लेखी स्वरूपात काय काय मुद्दे मांडणार? हे पाहावं लागणार आहे.
YouTube video player
आज निवडणूक आयोगात प्रत्यक्ष सुनावणी होणार नसली तरी युक्तिवाद लिखित स्वरूपात मिळाल्यानंतर पुढच्या काही दिवसात निवडणूक आयोग शिवसेनेच्या निवडणुकीच्या चिन्हाबाबतचा आपला अंतिम निकाल देऊ शकतो. 23 जानेवारीपासून 30 जानेवारीपर्यंत रोजी दोन्ही गटांना लेखी उत्तर सादर करण्याचे आदेश निवडणूक आयोगानं दिले. लेखी उत्तरं मिळाल्यानंतर आयोग पुढील कार्यवाही करणार आहे. ठाकरे गटाच्या वतीनं कपिल सिब्बल, देवदत्त कामत यांनी तर शिंदे गटाच्या वतीनं महेश जेठमलानी, मनिंदर सिंह यांनी युक्तीवाद करत आहेत. 10 जानेवारीला झालेल्या सुनावणीत ठाकरे गटाकडून कपिल सिब्बल यांनी या संपूर्ण प्रकरणाच्या कायदेशीर वैधतेबाबत प्रश्न निर्माण केले आहेत.

आयोगात आत्तापर्यंत नक्की काय-काय झालं?
– 10 जानेवारीला झालेल्या सुनावणीत ठाकरे गटाकडून कपिल सिब्बल (Adv Kapil Sibbal)यांनी या संपूर्ण प्रकरणाच्या कायदेशीर वैधतेबद्दल प्रश्न निर्माण केले.
– सर्वोच्च न्यायालयात खटला सुरु असताना ही सुनावणी आयोगाला करता येते की नाही याबाबत आधी निकाल द्यावा अशी विनंती केली.
– पण खटल्याच्या वैधतेसह सर्व निकाल आम्ही एकत्रित देऊ असं आयोगानं म्हटलं.
– शिंदे गटाचे वकील महेश जेठमलानी (adv Mahesh Jethmalani), मणिंदर सिंह (Manindar Singh)यांनी युक्तिवाद पूर्ण केले.
– ठाकरेंच्या पक्षप्रमुख पदावर त्यांनी प्रश्न उपस्थित केले, सादिक अली केसनुसार निवडणूक आयोग हेच एकमेव अथॉरिटी आहे अशा वादावर निर्णयासाठी हे शिंदे गटानं सांगितलं.
– 20 जानेवारीला लेखी उत्तर सादर करण्याचे निवडणूक आयोगाचे आदेश.

Exit mobile version