Why did the Maratha-OBC dispute break out in Anjangaon? : अठरा पगड जाती सोबत घेत शत्रूंविरोधात लढत स्वराज्य मिळवून देणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांना दैवत मानले जाते . मात्र याच महाराष्ट्रात शिवरायांच्या पुतळ्यावरून आता थेट मराठा विरुद्ध ओबीसी वाद पेटलाय . सोलापुर जिल्ह्यातल्या अंजनगाव खेलोबामध्ये सध्या एक वाद चांगलाच चिघळलाय . इथल्या खेलोबा मंदिराच्या आवारात मध्यरात्री अचानक शिवाजी महाराजांचा पुतळा बसवण्यात आला… त्यानंतर हा पुतळा दुसरीकडे हलवण्याची मागणी धनगर समाजानं केली. यामुळे आता दोन जातींमध्ये पेटलेल्या या वादाची नेमकी पार्शवभूमी काय आहे ?
सोलापूर जिल्ह्यातील माढामधील अंजनगाव खेलोबामध्ये दोन गटांमध्ये तणाव निर्माण झाला आहे. या गावामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसवण्यावरुन वादाला तोंड फुटलं. अंजनगाव खेलोबा मधील छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा धनगर समाजाचे दैवत खेलोबा मंदिरा जवळ बसवला आहे. सदर जागा देवस्थानची असल्याचे म्हणत धनगर समाजाने पुतळा बसवण्यावर आक्षेप घेतला. तर हि सरकारी जागा असल्याचे म्हणत शिवप्रेमी देखील आक्रमक झाले हेच या वादाचे मूळ कारण ठरले .
खेलोबा देवस्थानाजवळ छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा शिवप्रेमींनी बसवला. यामुळं धनगर समाज आक्रमक झाला व धार्मिक तेढ निर्माण होऊ नये यासाठी पोलीस प्रशासनाने तातडीने पाऊले उचलत रात्री पोलिसांनी पुतळा काढण्याची तयारी केली. यामुळे संतप्त झालेल्या शिवप्रेमी आक्रमक झाले. यावेळी दोन्ही गट भिडले व जमा झालेल्या जमावाकडून दगडफेक झाली. शिवरायांचा पुतळा बसवण्यावरून मराठा आणि धनगर समाजात सुरू झालेला वादला आता राजकीय वळण लागू राहिले आहे.
धनगर समाजाचा आक्षेप तर मराठा समाजाची भूमिका काय?
अंजनगाव खेलोबा गावातील खेलोबा देवस्थानाजवळ छत्रपती शिवरायांचा पुतळा बसवण्यात आला ती जागा धनगर समाजाची असून परवानगी न घेता पुतळा बसवल्याचा आरोप धनगर समाजाकडून केला जातोय. तर धनगर समाजाचा दावा मराठा समाजाने खोडून काढलाय. यावर धर्मवीर छत्रपती संभाजी राजे शौर्य प्रतिष्ठानचे बाळराजे पाटील म्हणले पुतळा बसवला ती जागा खेलोबा देवस्थानची नाही, यामुळे आम्ही पुतळा बसविणार अशी भूमिका मराठा समाजाच्या वतीने त्यांनी मांडली.
हाके -पाटील भिडले
पुतळा बसविण्यावरून झालेला या वादाला आता राजकीय वळण लागत आहे जोपर्यंत पुतळा हटवून मंदिर प्रवेशद्वार मोकळे होत नाही, तोपर्यंत मागे हटणार नाही असा इशारा ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी दिला. तर राज्यात आतापर्यंत शिवरायांचे 600 पुतळे बसवले कुठे विरोध झाला नाही. हाके यांनी जर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळयाला विरोध केला तर रस्त्यावर कपडे फाटेपर्यंत मारु असा थेट इशारा बाळराजे पाटील यांनी दिला. तर हाके यांनी वातावरण चिगळवण्याचा प्रयत्न करू नये, तसेच गावातील एकोपा टिकला पाहिजे वातावरण शांत राहिले पाहिजे यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत अस म्हणत आमदार अभिजीत पाटील यांनी हाके यांना सबुरीचा सल्ला दिला
