Download App

विकृतीत वाढ का होतेय? खासदार उदनराजेंचा सवाल

नाशिक : भाजप कार्यकारिणीची बैठक नाशिकमध्ये झाली. त्यासाठी राज्यभरातून भाजपचे दिग्गज नेते या बैठकीला उपस्थित होते. यावेळी अनेक मान्यवरांनी जे मुद्दे मांडले, ते सर्व लोकहिताचे होते. सर्व मुद्द्यांचा ठराव करण्यात आलाय. सर्वसामान्य जनतेशी निगडीत मुद्दे होते. लोकांपर्यंत पोहचण्याचं काम भारतीय जनता पक्ष करत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi)तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde)आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis)यांच्या नेतृत्वाखाली लोकांना दिलासा मिळालाय, असं भाजप खासदार उदयनराजे भोसले (MP Udayanraje Bhosale) यांनी सांगितलं.

महापुरुषांबद्दलच्या वादग्रस्त वक्तव्याबद्दल उदयनराजे म्हणाले, विकृतीत वाढ का होतेय? हे समजत नाही. महापुरुषांनी देशाच्या प्रगतीसाठी विचार मांडले आहेत. त्यांच्या उंचीपर्यंत आपण पोहचू शकत नाही. अशी वक्तव्य करणाऱ्यांची वैचारिक पातळी समजून घ्यावी. देशाच्या विकासासाठी विचार आणि वेळ खर्च केला तर जास्त योग्य ठरेल. महापुरुषांनी मोठं योगदान दिलंय, असंही उदयनराजे म्हणाले.

Nashik BJP Meet : चर्चा तर होणारच.. भाजप बैठकीसाठी फडणवीस-पंकजा मुंडे एकाच कारमधून

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मुंबई दौऱ्यावरुन पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नावर उदयनराजे म्हणाले की, विरोधकांचे सर्व मुद्दे संपलेले आहेत. जो काम करतो त्यालाच ठेचा लागतात. दुसऱ्यानं केलेल्या कामाचं श्रेय आपल्याला कसं मिळेल? असंही राजे म्हणाले. लोक सुज्ञ आहेत याचा विचार करतात, असंही ते म्हणाले.

Tags

follow us