Vijay Wadettiwar : अजित पवार यांना सोबत घेतल्याचा भाजपला काहीच फायदा होणार नसल्याचं विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी सांगितलं आहे. राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी अजित पवार गटाबाबत गौप्यस्फोट केल्यानंतर आता विजय वडेट्टीवारांनीही अजित पवार गटाविषयी थेट भाष्य केलं आहे.
Explainer : चांद्रयान 3 चौदा दिवसांनंतर पृथ्वीवर परतणार? सामान्यांच्या डोक्यात प्रश्नांचं काहूर
विजय वडेट्टीवार म्हणाले, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या गाठीभेटी होत असतील. कारण अनेक संस्थांमध्ये व्यवसायामध्ये ते भागीदारही असू शकतात, पण अजित पवारांना सोबत घेऊन भाजपला पश्चाताप होणार असून त्याचा काहीच फायदा होणार नसल्याचं भाकीत विजय वडेट्टीवार यांनी केलं आहे.
ज्यांच्यावर भाजपने गंभीर आरोप केले होते, आज त्यांनाच सत्तेत घेतलं आहे, याचं उत्तर जनता मागत असून जनता ही राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाच्याच मागे ठामपणे उभी आहे. इंडियामध्ये फुट पडेल, असा मला काही संशय वाटत नसल्याचंही त्यांनी यावेळी स्पष्ट केलं आहे. तसेच राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार हे कालच्या ‘इंडिया’ आघाडीच्या बैठकीला उपस्थित होते. शरद पवार इंडिया आघाडीसोबतच राहणार असल्याचा विश्वास आम्हाला असल्याचं विजय वडेट्टीवार यांनी स्पष्ट केलं आहे.
Chandrayaan-3 च्या यशाबद्दल जगभरातून कौतुकाचा वर्षाव, पाकिस्ताननेही केलंही भारताचं अभिनंदन
दरम्यान, यावेळी बोलताना विजय वडेट्टीवार यांनी विविध मुद्द्यावर भाष्य केलं आहे. कांदा निर्यात शुल्क ते चांद्रयान-3 च्या श्रेयावरुनही त्यांनी भाजपवर निशाणा साधला आहे. सरकारने कांदा निर्यातीवरील शुल्क रद्द करुन शेतकऱ्याच्या पाठिशी उभं राहावं, कारण राज्यातील अनेक जिल्हे दुष्काळाच्या वाटेवर चालल्याचं दिसून येत आहे, अशातच दोन लाख टन कांदा खरेदी करण्याच निर्णय सरकारने घेतला आहे, पण राज्यात रोज एक लाख टन कांदा मार्केटला जातो केंद्राच्या निर्णयामुळे दोन दिवस शेतकऱ्यांचा कांदा खरेदी होईल पण नंतर काय? असा सवालही त्यांनी यावेळी उपस्थित केला आहे.
तसेच पूजा, पाठ, ईश्वरीय योग, होम हवनवर विश्वास ठेवणाऱ्यांनी आता चांद्रयान-3 हे आमचं यश असल्याचं म्हणणं म्हणजे सत्य नारायणाची पूजा करुन चांद्रयान-3 यशस्वी झालं, असं होणार असल्याची टीकाही त्यांनी यावेळी केली आहे. तसेच देश स्वतंत्र्य झाल्यानंतर इस्त्रो उभं राहिलं तो दृष्टीकोन पंडित जवाहरलाल नेहरुंनी ठेवला आता लोकं म्हणतील की आम्ही बांधल पण त्यांच्यावर लोकं विश्वास ठेवणार नसल्याचंही ते म्हणाले आहेत.