Download App

शंभर टक्के मंत्री म्हणून शपथ घेणार, आमदार संतोष बांगरांचा मंत्रीपदावर दावा, शिंदेंचं टेन्शन वाढलं

  • Written By: Last Updated:

गेल्या एक वर्षांपासून शिंदे – फडणवीस सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार रखडला आहे. सत्ता संघर्षाच्या निकालानंतर मंत्रिमंडळ विस्तार होईल अशी आशा सरकारमधील आमदारांना होती. निकालानंतर देखील अजून मंत्रिमंडळ विस्तार झाला नाही. त्यात शिंदे गटातील आमदार मंत्रिपदासाठी गुडघ्याला बाशिंग बांधून तयार आहेत. हिंगोलीचे आमदार संतोष बांगर यांना मंत्रिपदाची वेध लागले आहेत. हिंगोलीत एका कार्यक्रमात बोलतांना संतोष बांगर यांनी येणाऱ्या मंत्रिमंडळ विस्तारात 100% मंत्री म्हणून शपथ घेणार असा विश्वास व्यक्त केला आहे. (100% will take oath as minister, MLA Santosh Bangar’s claim for ministership, Shinde’s tension increased)

संतोष बांगर यांच्या या इच्छेमुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा समोरील अडचणी वाढल्या आहेत. कोणाकोणाला मंत्रिपद द्यायचे याचे आव्हान आता एकनाथ शिंदे यांच्या समोर आहे. येणाऱ्या मंत्रिमंडळ विस्तारात शिंदे गटाच्या वाट्याला किती मंत्रिपद येतात. आणि त्यातून शिंदे कोणाला मंत्री करतात हे पाहणं उत्सुकतेचं असणार आहे.

शिंदे-फडणवीस सरकार स्थापन झाल्यानंतर पहिल्या मंत्रिमंडळ विस्तारात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह 20 जणांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. हे सर्व कॅबिनेट मंत्री आहेत. विधानसभेच्या एकूण सदस्यसंख्येचा विचार करता आणखी 23 जणांना मंत्रीपद दिले जाऊ शकते.

“आम्ही कुणाच्या घरात घुसत नाही; पण, घुसलोच तर…” : फडणवीसांचा ठाकरेंना इशारा

सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर सत्ताधारी गोटातूनच मंत्रिमंडळ विस्तार लवकरात लवकर व्हावा, अशी मागणी होत आहे. सत्ताधारी पक्षाच्या आमदारांमध्ये रखडलेल्या मंत्रिमंडळ विस्तारावरून नाराजी असल्याची चर्चा आहे. सोबतच या मुद्द्यांवरून विरोधकांकडून सरकारवर सातत्याने टीका केली जात आहे. मात्र आता लवकरच शिंदे फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार कधी होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

 

Tags

follow us