Download App

महाराष्ट्रात ओबीसींची जातिनिहाय जनगणना होणार? फडणवीसांनी स्पष्ट सांगितलं

मुंबई : बिहारनंतर आता महाराष्ट्रातही ओबीसींची जातिनिहाय जनगणना होणार असल्याची चिन्हे दिसून येत आहेत. बिहारची जनगणना झाल्यानंतर जनगणनेची पडताळणी करण्यासाठी अधिकाऱ्यांची समिती बिहारला पाठवणार असल्याचं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानपरिषदेत स्पष्ट केलं आहे.

इंदुरीकर महाराजांच्या निशाण्यावर गौतमी पाटील

दरम्यान, ओबीसींची जातिनिहाय जनगणना विधानसभेत एकमताने मंजूर झाल्यानंतर अद्याप अंमलबजावणी न झाल्याने हा सवाल उपस्थित करण्यात आला होता. त्यावर फडणवीसांनी प्रत्युत्तर दिलं आहे.

फडणवीस म्हणाले, बिहार सरकार असलेल्या जातिनिहाय जनगणनेचा अभ्यास अधिकाऱ्यांच्या समितीमार्फत केला जाणार आहे. बिहारची जातिनिहाय जनगणना पूर्ण झाल्यानंतर जनगणनेची पडताळणी करण्यासाठी एक समिती गठीत करण्यात येणार असल्याचंही त्यांनी यावेळी स्पष्ट केलंय.

सरकार पडणार, असे म्हणणारे नाना सहीसाठी मुख्यमंत्र्यांकडे जातात तेव्हा….

तसेच या समितीमार्फत जनगणनेचा अनुभव, नेमकी कशाप्रकारे जनगणना केली. जनगणना यशस्वी झालीय का? याबाबत अभ्यास केल्यानंतर आपल्याकडे जनगणनेबाबत निर्णय होणार असल्याचंही ते म्हणाले आहेत.

बिहारचा ओबीसी जनगणनेचा प्रयोग यशस्वी झाला असेल तर स्विकारु ते नसेल तर त्यामध्ये काय कमी आहे याची पडताळणी करुन आपण निर्णय घेऊ, असंही त्यांनी यावेळी स्पष्ट केलंय.

Pune Crime : पुण्यातील व्यक्तीला 250 वर्षांची शिक्षा, काय आहे प्रकरण जाणून घ्या?

दरम्यान, राज्यात ओबीसी आरक्षणाचा प्रश्न निर्माण झाला. त्यानंतर राज्यात नेमका ओबीसी समाज किती आहे? याची माहिती उपलब्ध होण्यासाठी जातिनिहाय जनगणना करण्याची मागणी करण्यात येत होती.

अखेर विधानसभेत हा ठराव एकमताने मंजूर झाल्यानंतरही अद्याप कोणतीही अंमलबजावणी झालेली नाही. पुढील काळात ओबीसी आरक्षणाचा मुद्दा मार्गी लावण्यासाठी ओबीसींची जातिनिहाय जनगणना होणार का? हे अद्याप अस्पष्टच आहे.

Tags

follow us