Download App

Winter Session : कौतुक करत जयंत पाटलांचे फडणवीसांना चिमटे; गृहखात्याचा काढला कच्चाचिठ्ठा

  • Written By: Last Updated:

Winter Session : राज्याच्या विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाचा (Winter Session) आज 20 डिसेंबरला शेवटचा दिवस आहे यावेळी राष्ट्रवादीचे शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी विधानसभेमध्ये भाषण केलं यावेळी त्यांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना चिमटे काढत गृह खात्याचा कारभारच सभागृहासमोर मांडला.

फडणवीसांनी हट्ट पूर्ण केला! मराठा समाजाच्या मागासलेपणाचे सर्वेक्षण ‘गोखले इन्स्टिट्यूट’ करणार

यावेळी बोलताना जयंत पाटील म्हणाले की, आपण उत्तर प्रदेश आणि बिहार राज्यांना कायद्याने सुरक्षेसाठी नाव ठेवत होतो मात्र आता बिहारमध्येच महाराष्ट्राचे नाव ठेवले जात असतील. त्यावेळी त्यांनी देवेंद्र फडणवीस यांचे नाव न घेता म्हटलं की आपलं लक्ष प्रशासनाकडे नाही मात्र पक्ष फोडण्याकडे आहे. त्यामुळे त्यांनी गृहखात्याकडे लक्ष दिले पाहिजे. असा सल्ला जयंत पाटलांनी दिला. तर एकेकाळी 2014 ते 19 मध्ये मुख्यमंत्री असणारे फडणवीस गृहमंत्री होते त्यावेळी ते नेहमी म्हणायचे की आमच्या काळामध्ये गुन्हेगारीचे प्रमाण कमी आहे मात्र महाविकास आघाडीच्या तुलनेत सध्या गुन्हेगारीचे प्रमाण वाढल्याचे दिसून येते. असं म्हणत राज्यातील गुन्हेगारीचा पाढाचं यावेळी जयंत पाटलांनी वाचला आहे.

‘दानवेंचे आरोप अन् लोढांचा अधिवेशनातच राजीनामा’; विधानपरिषदेत हायव्होल्टेज पॉलिटिकल ड्रामा

दरम्यान यावेळी जयंत पाटलांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांचं कौतुक करत त्यांना चिमटे काढले आहेत. ते म्हणाले की, पुष्पा या चित्रपटातील मैं फ्लॉअर नही फायर हू हा डायलॉग फडणवीस छान मारत होते. मात्र आता त्यांच्याच प्रशासनावर त्यांचा अंकुश राहिलेला नाही. त्यामुळे त्यांनी इतरांचे पक्ष फोडण्या पेक्षा गृहविभागाच्या कामावर लक्ष द्यावे. असा चिमटा त्यांनी काढला आहे.

Tags

follow us