पुण्यात मिसिंग लिंकवर काम चालू आहे, त्यामुळे तुम्हाला घाटरस्त्याने जावं लागणार नाही, असा अप्रत्यक्ष इशारा एकनाथ शिंदे यांनी दिला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (eknath shinde) यांनी आज ‘मुंबई तक’ वाहिनीला एक मुलाखत दिली, या मुलाखतीमध्ये त्यांनी सध्याच्या राजकीय परिस्थितीवर देखील भाष्य केलं.
यावेळी सुप्रीम कोर्टाच्या निकालानंतर येणाऱ्या परिस्थितीवर भाजपकडून राजकीय प्लॅन बी सुरु आहे, अशी चर्चा सुरु आहे. यावर बोलताना राजकारणात जर-तरला किंमत नसते, त्यामुळे निकाल येऊद्या असं त्यावेळी त्यावर निर्णय घेतला जाईल. पुण्यात मिसिंग लिंकवर काम चालू आहे, त्यामुळे तुम्हाला घाटरस्त्याने जावं लागणार नाही, असा असा अप्रत्यक्ष राजकीय इशारा एकनाथ शिंदे यांनी दिला.
शिवसेनेत फूट पडल्यापासून एकनाथ शिंदे यांना कायम मिंधे म्हणून टीका केली जात आहे. यावर बोलताना ते म्हणाले की मिंधेपणा म्हणजे काय लाचारी, मग सत्तेसाठी कुणी लाचारी पत्करली, हे सर्वानी पाहिले आहे. लोकांसाठी मदत मागण्याचा मिंधेपणा मी करेन, पण तुम्ही स्वतःच्या लाभासाठी मिंधेपणा केला. असं उत्तर त्यांनी दिल.
राज्यात नवीन सरकार आल्यापासून आम्ही चांगलं काम करत आहोत. आमच्या आधी काही लोकांनी (उद्धव ठाकरे) लोकांना घरात बसवलं होत. पण मी सगळ्या लोकांना घरातून बाहेर काढले, माझ्यामुळे लोक घराबाहेर पडले आणि काम करू लागले. अगदी आजारी लोक बरे झाले आहेत, अशी टीका त्यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर केली.
आम्ही निवडणुकांना घाबरत नाही. नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये आम्ही साडेसात हजार ग्रामपंचायतीपैकी तब्बल साडेचार हजार ग्रामपंचायती आम्ही जिंकल्या आहेत. त्यामुळे त्यांना माहिती आहे, लोक कोणासोबत आहे. त्यामुळे आम्ही निवडणुकांना घाबरत नाही.
पण आम्ही निवडणुका डोळ्यासमोर ठेवून आम्ही काम करत नाही. आम्ही राज्याच्या विकासासाठी काम करत आहोंत. नवीन सरकार आल्यापासून वैयक्तिक लाभ देणारे कोणतेही निर्णय आम्ही घेत नाही. अगदी तुम्ही आधीच्या सरकारने घेतलेले निर्णय आणि नवीन सरकार आल्यापासून घेतलेले निर्णय तुम्ही पाहा, त्यावरून तुम्हाला कळेल अशी माहिती त्यांनी सांगितली.