Mumbai Crime : गेल्या काही दिवसांपासून राज्याची राजधानी मुंबईमध्ये (Mumbai) महिला अत्याचाराच्या (sexually assault ) घटना वाढल्या आहेत. त्यामध्ये आता थेट मुंबईकरांची लाईफलाईन असलेल्या लोकलमध्येच (Local) एका 20 वर्षीय तरूणीवर अत्याचार झाल्याची घटना घडली आहे. बुधवारी 14 जूनला सकाळी ही विद्यार्थीनी परीक्षेला (Exam) जात असतानाच धावत्या ट्रेनमध्ये (Train ) ही घटना घटली आहे. ( 20 years old school girl sexually assaulted while going exam in Mumbai Local Train )
Nawazuddin Siddiqui करणार अवनीत कौरशी रोमान्स; बहुचर्चित ‘टिकू वेड्स शेरू’चा ट्रेलर प्रदर्शित
पोलिसांनी (Police) या घटनेच्या तत्परतेने कारवाई करत आठ तासांत या आरोपीला अटक केली आहे. जीआरपी अधिकाऱ्यांनी ही माहिती दिली. नवाज करीम ( वय 40 वर्षे) असं या आरोपीचं नावं आहे. हार्बर मार्गावरील मस्जिद बंदर आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ( CSMT) या स्थानकादरम्यान सकाळी साडे सात वाजेच्या दरम्यान ही घटना घडली.
Megha Dhade: ‘बिग बॉस मराठी’ फेम अभिनेत्री मेघा धाडेची राजकारणात एंट्री; ‘या’ पक्षात केला प्रवेश
ही पीडीत तरूणी मुंबईतील गिरगाव येथील विद्यार्थीनी असून ती नवी मुंबईतील बेलापूर येथे एका परीक्षेसाठी जात होती. सीएसएमटी ते पनवेल असा प्रवास करत ही मुलगी त्या डब्यात एकटीच होती. त्यानंतर हा आरोपी डब्यात चढला. ही मुलगी एकटीच असल्याचा फायदा घेत त्याने तिच्यावर हा निर्घृण अत्याचार केला. तर या मुलीने बचावासाठी आरडाओरडा केला असता त्याने मस्जिद बंदर स्थानकावर उतरत पळ काढला.
त्यानंतर या तरूणीने रेल्वे सुरक्षा दलााकडे यासंदर्भात तक्रार केली. पोलिसांनी अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल केला. तर अनेक शाखांच्या पोलिसांच्या पथकांनी शोध घेतल्यानंतर या ज्या मस्जिद बंदर स्थानकावर या आरोपीने उतरत पळ काढला. तेथिल सीसीटीव्ही फुटेज तपासले असता. त्याची ओळख पटल्यानंतर त्याला ताब्यात घेण्यात आले आहे. पोलिसांनी केवळ आठ तासात या आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत. या घटनेमुळे मुंबईकरांच्या लाईफलाईनमध्ये महिला असुरक्षित असल्याचं अधोरेखित झालं आहे.