Biparjoy storm : मुंबईतील जुहू कोळीवाड्याजवळ समुद्रात गेल्यानंतर बेपत्ता झालेल्या चार मुलांचा मृत्यू झाला आहे. 12 ते 16 वयोगटातील पाच मित्र सोमवारी सायंकाळी 5.30 वाजता जुहू कोळीवाड्याजवळील समुद्रात अर्धा किलोमीटर अंतरावर गेले होते, परंतु ते परत येऊ शकले नाहीत. या गृपमधील एका मुलाला वाचवण्यात यश आले होते, अशी माहिती एका अधिकाऱ्याने दिली आहे.
त्याने सांगितले की, त्यानंतर उर्वरित मुलांचा शोध घेण्यासाठी अग्निशमन दलाने सोमवारी भारतीय तटरक्षक दलाच्या मदतीने शोध मोहीम सुरू केली होती. सोमवारी रात्री अकराच्या सुमारास अंधार आणि खराब हवामानामुळे अग्निशमन दलाच्या जवानांनी शोधमोहीम मागे घेतली होती. यापूर्वी रात्री 8.20 वाजता या नौदलाचे हेलिकॉप्टरही मदतीसाठी बोलवण्यात आले होते.
यानंतर आज सकाळपासून बेपत्ता मुलांचा शोध घेण्यात आला. दुपारी बेपत्ता मुलांचा शोध लागला होता. त्यानंतर त्यांना कूपर रुग्णालयात नेण्यात आले होते. यावेळी डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले, असे एका अधिकाऱ्याने सांगितले. यामध्ये जय रोशन ताजबरिया (15), मनीष योगेश ओगानिया (12), शुभम योगेश ओगानिया (15) आणि धर्मेश वालजी फौजिया (16) अशी मृतांची नावे आहेत, असे अधिकाऱ्याने सांगितले. ‘बिपरजॉय’ चक्रीवादळ 15 जून रोजी गुजरात किनारपट्टी ओलांडण्याची शक्यता असल्याने अधिकाऱ्यांनी लोकांना आणि मच्छिमारांना समुद्रात न जाण्याचा सल्ला दिला आहे.
Eknath Shinde : आधीचे सरकार विकासातील स्पीडब्रेकर, डबल इंजिनने स्पीडब्रेकर हटवले, सीएम शिंदेची टीका
अरबी समुद्रावरील बिपरजॉय चक्रीवादळाचे तीव्र चक्री वादळात रूपांतर झाले आहे. भारतीय हवामानशास्त्र विभाग (IMD) च्या मते, ठाणे, रायगड, मुंबई आणि पालघर जिल्ह्यांतील काही भागात 45-55 किमी प्रतितास वेगाने वारे वाहतील. यासोबतच हलक्या पावसाचीही शक्यता आहे. दुसरीकडे, चक्रीवादळामुळे रविवारी गुजरात किनारपट्टीवर जोरदार वारे वाहत होते. चक्रीवादळ बिपरजॉय गुरुवारी गुजरात आणि पाकिस्तानच्या किनारपट्टीवर धडकण्याची शक्यता आहे.