Download App

गोरेगाव दुर्घटनेतील मृतांच्या कुटुंबियांना मुख्यमंत्र्यांकडून 5 लाखांची मदत जाहीर

  • Written By: Last Updated:

Mumabai : मुंबईतील (Mumbai Fire) गोरेगाव परिसरातील एका (Goregaon Fire) इमारतीला गुरुवारी रात्री भीषण आग लागली. या आगीत सहा जणांचा होरपळून मृत्यू झाला तर अनेक जण जखमी झाले आहेत. या घटनेतील जखमींना पुढील उपचारासाठी तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या घटनेने परिसरात मात्र खळबळ उडाली आहे. यावर आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Chief Minister Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री यांनी मदतीची घोषणा केली आहे.


गोरेगावच्या उन्नत नगर येथील एसआरएच्या जय भवानी इमारतीला भीषण आग लागून झालेल्या दुर्घटनेत काही नागरिकांना आपला जीव गमवावा लागला आहे. यात काही लहान मुलांचाही समावेश आहे. ही घटना अत्यंत दुर्दैवी असून त्यात जीव गमवावा लागलेल्या नागरिकांप्रती मी माझी सहवेदना व्यक्त करतो.

या आगीच्या घटनेबाबत मुंबई महानगरपालिका आयुक्त आणि पोलीस आयुक्तांकडून मी वेळोवेळी माहिती घेत असून मुंबईचे पालकमंत्री दीपक केसरकर तसेच मुंबई उपनगरांचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांना प्रत्यक्ष घटनास्थळी भेट देण्याचे निर्देश दिले आहेत.या दुर्घटनेत मृत्यू झालेल्या मृतांच्या कुटूंबियांना शासनाकडून ५ लाख रुपयांची मदत जाहीर केली असून, जखमी नागरिकांवर सरकारी खर्चाने वैद्यकीय उपचार करण्यात येतील, असे राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी सांगितले आहे.


तसेच मुंबई येथे लागलेल्या आगीच्या घटनेत झालेल्या जीवितहानीबद्दल जाणून दुःख झाले . आम्ही बीएमसी आणि मुंबई पोलिस अधिकाऱ्यांच्या संपर्कात आहोत आणि सर्व मदत केली जात आहे. ज्यांनी आपल्या प्रियजनांना गमावले त्यांच्या कुटुंबियांबद्दल माझ्या मनापासून संवेदना आणि जखमींना लवकरात लवकर बरे होण्याची इच्छा आहे.

Mumbai : इमारतीला भीषण आग! 6 जणांचा होरपळून मृत्यू, 14 जखमी

नेमकं काय घडलं?

मुंबईतील (Mumbai) गोरेगाव परिसरात एक पाच मजली इमारत आहे. गुरुवारी मध्यरात्रीच्या सुमारास या इमारतीच्या पार्किंगला भीषण आग लागली. थोड्याच वेळात या आगीने सगळी इमारतच कवेत घेतली. या आगीत इमारतीमधील अनेक लोक जखमी झाले तर सहा जणांचा होरपळू मृत्यू झाला. या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन यंत्रणा तातडीने घटनास्थळी दाखल झाल्या. अग्निशमन दलाच्या जवानांनी आगीवर नियंत्रण मिळवले. त्यानंतर आगीत होरपळलेल्या नागरिकांना उपचारासाठी दवाखान्यात दाखल करण्यात आले. उपचार सुरू असतानाच सहा जणांचा मृत्यू झाला. तसेच काही जणांची प्रकृती चिंताजनक आहे त्यामुळे मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे. या घटनेत इमारतीच्या तळमजल्यावरील वाहनेही जळून खाक झाल्याची माहिती मिळत आहे.

Tags

follow us