Mumbai : इमारतीला भीषण आग! 6 जणांचा होरपळून मृत्यू, 14 जखमी

Mumbai : इमारतीला भीषण आग! 6 जणांचा होरपळून मृत्यू, 14 जखमी

Mumabai : मुंबईतील (Mumbai) गोरेगाव परिसरातील एका (Goregaon Fire) इमारतीला गुरुवारी रात्री भीषण आग लागली. या आगीत सहा जणांचा होरपळून मृत्यू झाला तर अनेक जण जखमी झाले आहेत. या घटनेतील जखमींना पुढील उपचारासाठी तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या घटनेने परिसरात मात्र खळबळ उडाली आहे. ही आग कोणत्या कारणामुळे लागली याची माहिती अद्याप समोर आलेली नाही. मुंबईतील (Mumbai) गोरेगाव परिसरात एक पाच मजली इमारत आहे. गुरुवारी मध्यरात्रीच्या सुमारास या इमारतीच्या पार्किंगला भीषण आग लागली. थोड्याच वेळात या आगीने सगळी इमारतच कवेत घेतली.

या आगीत इमारतीमधील अनेक लोक जखमी झाले तर सहा जणांचा होरपळू मृत्यू झाला. या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन यंत्रणा तातडीने घटनास्थळी दाखल झाल्या. अग्निशमन दलाच्या जवानांनी आगीवर नियंत्रण मिळवले. त्यानंतर आगीत होरपळलेल्या नागरिकांना उपचारासाठी दवाखान्यात दाखल करण्यात आले. उपचार सुरू असतानाच सहा जणांचा मृत्यू झाला. तसेच काही जणांची प्रकृती चिंताजनक आहे त्यामुळे मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे. या घटनेत इमारतीच्या तळमजल्यावरील वाहनेही जळून खाक झाल्याची माहिती मिळत आहे.

रणबीरनंतर आता कपिल शर्मा, हुमा कुरेशीला ED चे समन्स, सखोल चौकशी होणार

दरम्यान, आग कशामुळे लागली याचे कारण अद्याप कळालेले नाही. आगीत आतापर्यंत सहा जणांचा मृत्यू झाला आहे. तर 14 जण जखमी झाले आहेत. इमारतीमधील 30 लोकांना सुरक्षित बाहेर काढण्यात यश मिळाले आहे. जखमी झालेल्यांमध्ये सात महिला आणि सात पुरुषांचा समावेश आहे. जखमींवर मुंबईतील ट्रॉमा केअर येथे उपचार करण्यात येत आहेत. या घटनेत इमारत आणि पार्किंगमधील 30 दुचाकी तर चार मोठ्या वाहनांचे नुकसान झाले आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube