Download App

Chandrakant Patil : दिव्यांग विद्यापीठ स्थापन करण्यासाठी समिती गठीत करावी

मुंबई : राज्यात दिव्यांग विद्यापीठ (Disability University) स्थापन करण्यासाठी समिती गठीत करण्यात यावी, असे निर्देश उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी दिले.

अमरावती (Amravati)जिल्ह्यात दिव्यांग विद्यापीठ स्थापन करण्यासंदर्भात उच्च व तंत्र शिक्षण मंत्री पाटील यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात बैठक झाली. त्यावेळी ते बोलत होते. दिव्यांग बांधवांच्या शैक्षणिक सोयीसाठी राज्यात स्वतंत्र दिव्यांग विद्यापीठ होणे गरजेचे असल्याचे पाटील म्हणाले.

राज्यात स्वतंत्र दिव्यांग विभाग स्थापन करण्याचा निर्णय शासनाने यापुर्वीच घेतला आहे. दिव्यांग बांधवांच्या शैक्षणिक सोयीसाठी राज्यात स्वतंत्र दिव्यांग विद्यापीठ होणे गरजेचे आहे. त्यासाठी राज्य शासन सकारात्मक असल्याची माहिती मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली.

या विद्यापीठाच्या कामाला गती यावी, यासाठी समिती गठीत करण्यात येणार असल्याचे पाटील म्हणाले. यावेळी माजी राज्यमंत्री आमदार बच्चू कडू ,उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे प्रधान सचिव विकासचंद्र रस्तोगी, उपसचिव अजित बाविस्कर, उच्च शिक्षण संचालक शैलेंद्र देवळाणकर उपस्थित होते.

Tags

follow us