पुणे : 2014 साली आयटी इंजिनिअर मोहसिन शेखची पुण्यात निर्घृण हत्या (Mohsin Shaikh Murder) करण्यात आली होती. या हत्येनंतर हिंदू राष्ट्रसेनेचा अध्यक्ष धनंजय देसाई (Dhananjay Desai Arrested) यांना अटक करण्यात आली होती. यानंतर आज कोर्टाने देसाईंसह सर्व 20 आरोपींची निर्दोष मुक्तता केली आहे.
यानंतर धनंजय देसाई यांची पहिली प्रतिक्रिया आली आहे. ते म्हणाले, 2014 मध्ये शिवाजी महाराज यांची विटंबना केली होती. खरे आरोपी शोधायचे सोडून त्या वेळी सरकारने त्यांच्या सोयीचे आरोपी शोधले होते असा आरोप केला आहे.
पुढे बोलताना धनंजय देसाई म्हणाले की, महाराष्ट्रात आघाडी सरकारला सत्ता जाणार आहे हे माहीत होतं, म्हणून तेव्हाच्या सरकारने पोलिसांचा वापर करून खोटे आरोपी तयार केले.
आज न्यायालयाच्या लक्षात आलं की ही खोटी केस आहे. हिंदू राष्ट्र सेनेच्या 20 जणांना आणि निष्पाप हिंदूंना वेठीस धरलं होतं. आज सगळे साक्षीदार खोटे निघाले आहेत.
एकूण 7 वर्ष मी कारागृहात काढली आहेत. तपास अधिकाऱ्यांना पण सांगून ठेवलं होतं की आरोपी कोण दाखवायचे आहेत. त्यांना आरोपी शोधायचे नव्हतेच. माझ्याकडे तपास दिला तर मी कदाचित शोधू शकतो की आरोपी कोण आहे.
कोर्टात आज एक ही साक्षीदाराने सांगितलं नाही की तिथे मी होतो. ते प्रामाणिक मुस्लिम आहेत. ती घटना म्हणजे एक अपघात होता पण माझ्यावर 120 कलम लावण्यात आला. राजकीय जिहाद सध्या सुरू आहे मात्र आगामी काळात भारतात हिंदू राष्ट्र ही चळवळ राबवणार आहोत असेही देसाई म्हणाले.