Maharashtra politics : शिंदे-फडणवीस सरकारमध्ये उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर अजित पवारांनी पक्ष आणि चिन्हावर दावा सांगितला आहे. राष्ट्रवादी आणि घड्याळ चिन्हावर निवडणूक लढवणार असे त्यांनी सांगितले होते. यावर शरद पवार म्हणाले की माझे काही म्हणणे नाही. कोणी काही दावा करा. माझा लोकांवर विश्वास आहे. मी लोकांमध्ये जाईल आणि हा निर्णय लोक ठरवतील. राष्ट्रवादी हा पक्ष नव्हता पण आमच्यातील काही सहकाऱ्यांना भूमिका पटली नाही म्हणून पक्ष स्थापन केला. पहिला पक्ष दुसऱ्यांनी नेला असेल पण त्यांच्या परिणाम आमच्यावर होणार नाही. त्यामुळे कोणी काही केलं तरी आम्ही लोकांमध्ये जाऊन आमची भूमिका मांडू, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी सांगितले. (Action will be taken against Praful Patel and Sunil Tatkare; Sharad Pawar’s warning)
अजित पवार यांनी सांगितले होते की शुक्रवारी विरोधी पक्ष नेतेपदाचा राजीनामा दिला होता. यावर शरद पवार म्हणाले की याबाबत मला काही माहिती नव्हती. राजीनामा दिल्याचे माध्यमातून समजले. आता विरोधी पक्षनेता कोण असणार हे सांगता येणार नाही. कारण हा निर्णय घेण्याचा अधिकार विधानसभा अध्यक्षांचा आहे. येत्या तीन-चार दिवसांत आम्ही चर्चा करु. त्यामध्ये उद्या काँग्रेस असू शकतो, शिवसेना असू शकतो किंवा आम्ही जी राष्ट्रवादी म्हणतो त्यांचा असू शकतो. तिन्ही पक्षातील संख्या पाहून निर्णय घेऊ, असे शरद पवार यांनी सांगितले.
CM शिंदेंच्या पावलावर पाऊल टाकतं अजितदादांनी राष्ट्रवादी फोडली
काही लोकांनी जी भूमिका घेतली ती पक्षाच्या धोरणाचा विषय नाही. पक्षांच्या धोरणाच्या विरोधात कोणी पावले टाकले असतील तर ते पक्षांच्या दृष्टीने योग्य नाही. पक्षाचे प्रमुख बसून यावर निर्णय घेतील. मी पक्षाचा अध्यक्ष आहे. काही पदाधिकाऱ्यांची नियुक्ती मी केली आहे. खजिनदार म्हणून सुनिल तटकरेंची नेमणूक मी केलेली आहे. कार्याध्यक्ष म्हणून प्रफुल्ल पटेल यांनी नियुक्ती केली आहे. पक्षाच्या हिताच्या दृष्टीने त्यांनी जे पावले टाकायला पाहिजे होती ते त्यांनी टाकले नाहीत. त्यामुळे त्यांच्यावर पक्ष नेतृत्वाचा विश्वास राहिला नाही. त्यामुळे त्यांनी स्वत:हून उचित कारवाई करावी अन्यथा मला करावी लागणार आहे, असा इशारा शरद पवार यांनी दिला.
अशोक चव्हाणांचा उद्धव ठाकरेंना फोन, अजितदादांनाही भेटले; उघड केलं मोठं सत्य
आमची खरी ताकद सामान्य माणूस आणि कार्यकर्ता आहे. ज्यांच्या विरोधात आम्ही भूमिका घेतली आणि त्यांच्यासोबत गेलो तर ते लोक अस्वस्थ होतात. त्यामुळे आम्ही उद्यापासून आम्ही पक्ष संघटनेची बांधणी करणार आहेत. तरुण लोक आम्हाला साथ देतील, असे शरद पवार यांनी सांगितले.