CM शिंदेंच्या पावलावर पाऊल टाकतं अजितदादांनी राष्ट्रवादी फोडली

CM शिंदेंच्या पावलावर पाऊल टाकतं अजितदादांनी राष्ट्रवादी फोडली

Maharashtra Political Crisis :  राज्याच्या राजकारणात मोठा भूकंप झाला असून राष्ट्रवादीत अजित पवार (Ajit Pawar) यांनी पुन्हा एकदा बंडाचे निशाण फडकवले आहे. अजित पवार यांचा आज (2 जुलै) शपथविधी झाला असून त्यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आहे. तर अन्य 8 आमदारांनीही मंत्रिपदाची शपथ घेतली. राष्ट्रवादीच्या (NCP) 40 आमदारांचा अजित पवार यांना पाठिंबा असल्याचे बोलले जात आहे. यामुळे अजित पवारांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या पावलावर पाऊल ठेवत राष्ट्रवादी काँग्रेस फोडल्याची चर्चा आता सुरु झाली आहे.

एकनाथ शिंदे यांनी वर्षभरापूर्वी शिवसेनेच्या चाळीस आमदारांसह भाजपसोबत सरकार स्थापन केले. या सत्ता संघर्षाला दोन दिवसांपूर्वीच एक वर्ष पूर्ण झाले. सुरुवातीला एकनाथ शिंदे हे पंधरा ते वीस आमदारांसह सुरत येथे गेले होते. त्यानंतर ते गुवाहाटी येथे मुक्कामास गेले. या दरम्यान शिवसेनेचे एक एक करून जवळपास 40 आमदार शिंदेंना येऊन मिळाले.

‘त्या’ सहकाऱ्यांची भूमिका दोन दिवसांत समोर येईल, बंडानंतर शरद पवारांचं मोठं विधान…

त्यानंतर शिंदे यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. शिवसेनेच्या 18 खासदारांपैकी तेरा खासदारांनी एकनाथ शिंदे यांना पाठिंबा दिला. यानंतर शिवसेना पक्ष आम्ही सोडला नसून आम्ही शिवसेनेतच आहोत, असे म्हणत शिंदेंनी शिवसेनेवर दावा केला होता. हा सगळा सत्ता संघर्ष सर्वोच्च न्यायालय व निवडणूक आयोगाकडे गेला.

शिवसेना पक्ष व धनुष्यबाण हे चिन्ह कोणाचे हा ठरविण्याचा अधिकार निवडणूक आयोगाचा होता. त्यानंतर निवडणूक आयोगाने शिवसेना हा पक्ष व धनुष्यबाण हे चिन्ह एकनाथ शिंदे यांच्या गटाला दिले व अधिकृतपणे शिवसेना पक्ष एकनाथ शिंदेंकडे गेला. हा निर्णय देताना निवडणूक आयोगाने शिंदे सोबत असलेले पक्षातील बहुतांश आमदार व बहुतांश खासदार यांचा विचार करून घेतल्याचे बोलले गेले.

Raj Thackeray : पवारांची पहिली टीम सत्तेच्या दिशेने रवाना, यथावकाश दुसरी पण सत्तेच्या सोपानासाठी रुजू होईलच !

त्याचप्रमाणे अजित पवार यांच्याकडे देखील पक्षातील जवळपास 36 आमदारांचे समर्थन असल्याचे बोलले जात आहे. यासह शरद पवार यांचे अतिशय निकटवर्तीय मानले जाणारे पक्षाचे कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल हे देखील आजच्या शपथविधीला उपस्थित होते. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ, दिलीप वळसे पाटील, सुनील तटकरे आदी नेते मंडळींनी अजित पवारांच्या या निर्णयाला पाठिंबा दर्शविला आहे.

एकनाथ शिंदे यांच्या न्यायाने विचार केला असता, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कुणाचा हा वाद निवडणूक आयोगाकडे गेला, तर या पक्षाचा ताबा अजित पवारांकडे येऊ शकतो. अजित पवार यांनी आज पत्रकार परिषदेत बोलताना आम्ही आगामी सर्व निवडणुका या राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणून घड्याळ या चिन्हावर लढविणार असल्याचे सांगितले. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कुणाचा यावरून शरद पवार अन् अजित पवार यांच्यामध्ये संघर्ष पहायला मिळणार असल्याचे दिसते आहे.

 

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube