Download App

अतिरिक्त पोलीस महासंचालक विश्वास नांगरे पाटील यांनी केली रंगाची उधळण

  • Written By: Last Updated:

मुंबई : काल देशभर होळी (Holi) साजरी झाली अन् आज सगळीकडे धुळवड अर्थात रंगांचा उत्सव साजरा केला जात आहे. दरम्यान, कोरोनामधल्या दोनेक वर्षानंतर निर्बंधमुक्त होळी आणि धुळवड हे सण राज्यभरात साजरे होत आहे. अनेक सेलिब्रिटी आणि राजकारणी हे आनंदात धुळवड साजरी करताना दिसत आहेत. आज सकाळपासूनच या रंगांच्या उत्सावाला सुरूवात झाली आहे. लहानलहान बच्चे कंपनींपासून ते अगदी मोठ्यांपर्यंत सगळेजण या रंगाची उधळण करत आहेत. एकमेंकावर रंग, पाणी टाकून सगळेजण हा रंगाचा उत्सव आनंदात एन्जॉय करत आहेत. दरम्यान, अतिरिक्त पोलीस महासंचालक विश्वास नांगरे पाटील (Vishwas Nangre Patil) यांनीही आपल्या कुटुंबियांसह मोठ्या जल्लोषात धुलिवंदन साजरं केलं आहे.

मराठी सण हा सगळ्यांच्याच जवळाच विषय आहे. त्यातही होळी, रंगपंचमी आणि धूलिवंदन हे सण मराठी माणसांच्या अत्यंत जिव्हाळ्याचे सण आहेत. सध्या संपूर्ण राज्यभरात होळी आणि धुळवडीचा उत्साव सुरू आहे. त्यामुळे सगळेजण उत्साहात आहेत. अशातच विश्वास नांगरे पाटील यांनी देखील होळी आणि धुळवड मोठ्या उत्साहात साजरी केली. त्यांनी आपल्या कुटुंबियांसोबत आपल्या राहत्या घरी धुळवडीचा आनंद लुटला. शिस्तप्रिय, कर्तव्यदक्ष आणि करारी पोलीस अधिकारी अशी ओळख असलेले विश्वास नांगरे पाटील हे कायम सोशल मीडियावर प्रचंड सक्रीय असतात. त्यांच्या पोस्ट ह्या कायम लक्ष वेधून घेत असतात. त्यामुळे त्यांचा मानणारा सोशल मीडियावर मोठा चाहता वर्ग आहे. त्यांनी धुलिवंदानानिमित्त फेसबुक अकाऊंटवर आपला खास फोटो पोस्ट केला आहे.

Amruta Fadanvis यांनी दिल्या खास पद्धतीने दिल्या होळीच्या शुभेच्छा

धुळवड सेलिब्रेशन करताना विश्वास नांगरे यांचा या कलरफूल फोटोत वेगळाच अंदाज पाहायला मिळाला. या फोटोत त्यांचे कपडे आणि अंगावर रंगाची उधळण झालेली दिसते. रंग, पिचकाऱ्या आणि पाण्यात त्यांनी आपल्या परिवारासोबत चांगलीच धम्माल केली. यावेळी त्यांना त्यांच्या चाहत्यांनी देखील त्यांना होळी आणि धुळवडीच्या खास शुभेच्छा दिल्या आहेत.

Tags

follow us