‘गंदी बात’ फेम अभिनेता Aditya Singh Rajput याचा मृत्यू, बाथरुमध्ये आढळला मृतदेह

Aditya Singh Rajput Death :’स्प्लिट्सविला’ शो आणि ‘गंदी बात’ या वेबसिरीजमधून प्रसिद्धीच्या झोतात आलेला अभिनेता आदित्यसिंह राजपूत याचा मृत्यू झाला आहे. ३२ वर्षीय अभिनेता आदित्यचा मृतदेह त्याच्या घरातील बाथरुममध्ये आढळून आला आहे. या मृत्यूने संपूर्ण टीव्ही इंडस्ट्रीत खळबळ उडाली असून सर्वांनाच धक्का बसला आहे. ड्रग्जच्या ओव्हरडोसमुळे त्याचा मृत्यू झाल्याचा संशय मुंबई पोलिसांना आहे. Anupam Kher […]

SING RAJPUT

SING RAJPUT

Aditya Singh Rajput Death :’स्प्लिट्सविला’ शो आणि ‘गंदी बात’ या वेबसिरीजमधून प्रसिद्धीच्या झोतात आलेला अभिनेता आदित्यसिंह राजपूत याचा मृत्यू झाला आहे. ३२ वर्षीय अभिनेता आदित्यचा मृतदेह त्याच्या घरातील बाथरुममध्ये आढळून आला आहे. या मृत्यूने संपूर्ण टीव्ही इंडस्ट्रीत खळबळ उडाली असून सर्वांनाच धक्का बसला आहे. ड्रग्जच्या ओव्हरडोसमुळे त्याचा मृत्यू झाल्याचा संशय मुंबई पोलिसांना आहे.

Anupam Kher : शूटिंगदरम्यान अनुपम खेर गंभीर जखमी; फ्रॅक्चर झालेला फोटो शेअर करुन दिली माहिती

आदित्य हा मुंबईतील अंधेरी परिसरातील एका अपार्टमेंटमध्ये राहत होता. तो बाथरूममध्ये बेशुद्ध अवस्थेत पडलेला आढळला. त्याच्या एका मित्राने तातडीने इमारतीच्या चौकीदाराला याची माहिती दिली. त्यानंतर त्याला रुग्णालयात नेण्यात आले. परंतु डॉक्टरांनी आदित्यचा मृत्यू झाल्याचे जाहीर केले आहे. मुंबई पोलिसांनी आदित्यचा मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठविला आहे. आदित्य सिंग राजपूतचा मृत्यू ड्रग्जचा ओव्हरडोसमुळे झाला असल्याचा संशय पोलिसांना आहे.

Urfi Javed Bold Photo: उर्फी जावेदने नेटच्या आउटफिटमध्ये दिली सेक्सी पोझ, अभिनेत्रीची अदा पाहून व्हाल घायाळ

आदित्य राजपूतला याला टीव्ही रियॅलिटी शो ‘स्प्लिट्सविला’ प्रसिध्द मिळाली होती. कास्‍ट‍िंग डायरेक्‍टर म्हणून त्याने नाव कमविले होते. त्याने तीनशेहून अधिक टीव्ही जाहिरातीत काम केले आहे. आदित्य सिंग राजपूत याचा जन्म दिल्लीत झालेला असून, त्याचे कुटुंब मुळचे उत्तराखंड येथील आहे. त्याने वयाच्या १७ व्या वर्षी मॉडेलिंग क्षेत्रात करिअरला सुरुवात केली होती. आदित्यचा कुटुंबात आई-वडिल आणि मोठी बहिण असा परिवार आहे.

https://www.youtube.com/watch?v=Qn8eGBZNqoY

Exit mobile version