Aditya Thackeray : काही दिवसांपूर्वी ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांनी मुंबई महापालिकेने फर्निचर घोटाळा केल्याचा आरोप केला होता. याशिवाय मुंबईत हजारो कोटींची रस्त्यांची कामे रखडल्याचं सांगत सरकारवर सातत्यानं हल्लाबोल केला. आताही त्यांनी मुंबई महानगरपालिकेच्या कथित रस्ते घोटाळ्यावरून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला.
“जुन्या जखमा अजून विसरलेलो नाही…” : संभाजीराजे छत्रपतींकडून लोकसभेचे पिक्चर क्लिअर!
आज महा निष्ठा, महा न्याय हा शिवसैनिकांचा मेळावा मंबईत झाला. या मेळाव्याला संबोधित करतांना त्यांना भाजप आणि शिंदेगटावर जोरदार हल्ला चढवला. ते म्हणाले, दक्षिण मुंबईत टेंडर घोटाळा झाला. एका वर्षात एकही रस्ता झाला नाही. सीएम म्हणजे करप्ट मॅन, करप्ट मंत्री. आपल्या मुख्यमंत्र्यांना टेंडरमध्ये इतका इटरेस्ट आहे की, ते आईसक्रीम देखील टेंडर कोकोरटचं खातात. ट्रॅक्टर आणि कॉन्ट्र्कॅक्टमधला फरकही मुख्यमंत्र्यांना कळत नाही, अशी टीका आदित्य ठाकरेंनी केली.
कोरोनाला हलक्यात घेऊ नका, दिवसभरात 154 नव्या रुग्णांची नोंद, तर दोघांचा मृत्यू
ते फक्त दाढ्या कुरवाळत होते
ते म्हणाले, वेदांता प्रकल्प महाविकास आघाडीचं सरकार असतांना महाराष्ट्रात येणार होता. त्यातून 1 लाख लोकांना रोजगार मिळणार होता. मात्र, केंद्रातील भाजप सरकारनं खोक्यांच्या मदतीनं आपलं सरकार पाडलं. आणि घटनाबाह्य मुख्यमंत्र्यांना सत्तेत बसवलं. सरकार पाडल्यानंतर वेदांता प्रकल्प गुजरातला गेला, तेव्हा आपले सीएम काय करत होते, तर ते फक्त दाढ्या कुरवाळत होते, अशी घणाघाती टीकाही आदित्य ठाकरेंनी केली.
दक्षिण मुंबईवर देशाचं लक्ष आहे. कारण कारण हीच दक्षिण मुंबई देशाला चालवत आली आहे. आणि हेच भापजला खटकतं. हीच भाजप आणि खोके सरकारची पोटदुखी आहे. त्यामुळं त्यांना मुंबईला मोडून काढायचं आहे. त्यासाठी अनेक उद्योग पळवले जात आहे. गेल्या दहा वर्षात इथलं सर्व उद्योग गुजरातला गेले. केंद्र व राज्य सरकार हे महाराष्ट्र विरोधी आहे, अशी टीकाही त्यांनी केली.
सरकारचं मंत्रालय दिल्लीत
आदित्य ठाकरे म्हणाले, हे राज्य सरकार केंद्राच्या हातचं बाहुलं आहे. दिल्लीनं डोळे वटारले ही गप्प बसतात. या सरकारच्या हातून वेदांता प्रकल्प गेला. आता महानंदा प्रकल्पही गेला. हिरे व्यापारही पळवला. तरीही हे सरकार काहीच करत नाही. या सरकारनं एकही तुमच्या हिताचा निर्णय घेतला नाही. त्यामुळं हे सरकार दिल्लीतून चालतं, या सरकारचं मंत्रालय दिल्लीत आहे, असा खोचक टोलाही त्यांनी लगावला.