Kirit Somayya : मढ मालाड येथील बेकायदा स्टुडिओला आदित्य ठाकरेंचा आशिर्वाद

मुंबई : काही महिन्यांपूर्वी भाजप नेते किरीट सोमय्या (Kirit Somayya) यांनी अस्लम शेख यांच्यावर मुंबईतील मालाड पश्चिम मढ येथील बेकायदा स्टुडिओवरून गंभीर आरोप केले होते. त्यांनी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्रही लिहिलं होतं. त्या पत्रात सोमय्या यांनी बेकायदा स्टुडिओ बांधण्याासाठी अस्लम शेख यांनी परवानगी दिली होती, ज्यात एक हजार कोटी […]

Untitled Design   2023 04 08T160322.200

Untitled Design 2023 04 08T160322.200

मुंबई : काही महिन्यांपूर्वी भाजप नेते किरीट सोमय्या (Kirit Somayya) यांनी अस्लम शेख यांच्यावर मुंबईतील मालाड पश्चिम मढ येथील बेकायदा स्टुडिओवरून गंभीर आरोप केले होते. त्यांनी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्रही लिहिलं होतं. त्या पत्रात सोमय्या यांनी बेकायदा स्टुडिओ बांधण्याासाठी अस्लम शेख यांनी परवानगी दिली होती, ज्यात एक हजार कोटी रुपयांची अफरातफर झाल्याचा आरोप सोमय्या यांनी केला होता. दरम्यान, आता या बेकायदा स्टुडिओबाबत किरीट सोमय्या हे पुन्हा एकदा आक्रमक झाले आहेत. या घोटाळ्याला आदित्य ठाकरे, (Aditya Thackeray) असलम शेख आणि महापालिका आयुक्त इकबाल चहल यांचा आशिर्वाद आहे. 1 हजार करोड रुपयांचा हा घोटाळा असून मी याबाबत गुन्हा दाखल करणार असल्याचंही सोमय्या यांनी सांगितलं.
Sharad Pawar | अदानी घोटाळा, सुप्रीम कोर्टाची समितीच योग्य का? ऐका... | LetsUpp Marathi

सोमय्या यांनी सांगितले की, आदित्य ठाकरे आणि अस्लम शेख हे दोघे देखील स्टुडिओची पाहणी करायचे. स्थानिक पालकमंत्र्यांना तक्रारी दिल्या होत्या. परंतु या दोघांचे टुरिझम चालू होते. महाराष्ट्र पोस्टर झोन मॅनेजमेंट ऑथॉरिटीच्या माध्यमातून या स्टुडिओला परवानगी देण्यात आल्या होत्या. तात्पुरत्या स्वरूपाच्या परवानगी देण्यात आल्या. महत्वाचं म्हणजे, अनधिकृतरित्या या परवानग्या देण्यात आल्या होत्या. आदित्य ठाकरे पर्यावरण मंत्री असताना अशा प्रकारच्या परवानगी द्यायला अधिकार हा संबंधित यंत्रणांना देखील नव्हता. कालपर्यंत या स्टुडिओ मध्ये शूटिंग सुरू होतं. रामसेतू आणि अशा अनेक चित्रपटांचे शूटिंग या स्टुडिओमध्ये झालं, असं ते म्हणाले.

Ghar Banduk Biryani : ‘घर बंदूक बिरयानी’चा धिंगाणा, नागराजचा हलगीवर आकाश-सायलीने धरला ठेका

सोमय्या म्हणाले की, 27 जुलै 2022 ला राज्यचात शिंदे सरकार आलं आणि कार्यवाहीला सुरुवात झाली. तात्पुरत्या स्वरूपाचं परवानगी घेतल्या असल्या तरी त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात बांधकाम झाले, असल्याचं निरीक्षण देखील यंत्रांकडून नोंदविण्यात आलं. या स्टुडिओ घोटाळ्यावर स्पेशल एस आय टी ची रचना झाली पाहिजे. पर्यावरणाचे किती नुकसान झालं आहे याची चौकशी केली पाहिजे.

या घोटाळ्याला आदित्य ठाकरे, असलम शेख आणि महापालिका आयुक्त इकबाल शहर यांचा आशिर्वाद आहे. एकूण हजार छोटे मोठे स्टुडिओ बसविले गेले आहेत
1 हजार करोड रुपयांचा हा घोटाळा आहे. या सर्व प्रकरणासंदर्भात मी गुन्हा दाखल करणार असल्याचंही सोमय्या यांनी सांगितलं. ते म्हणाले की, मी आरोप करत नाही, मी पुरावे देतो, मी संजय राऊत नाही. दरम्यान, कोविड घोटाळ्यामध्ये इकबाल चहर यांची देखील कार्य चौकशी झाली पाहिजे पालिकेकडून जर तक्रार दाखल झाली नाही तर मी पुढच्या आठवड्यात जाऊन मलाड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करणार असल्याचं सोमय्या म्हणाले.

सोमय्या यांनी थेट आदित्य ठाकरे यांच्यावरच आरोप केल्यानं आदित्य ठाकरे यांची चांगलीच कोंडी होणार आहे.

Exit mobile version