Download App

हिंदुत्त्ववादी सरकार हवं! मतदानानंतर बाप-लेकाची प्रतिक्रिया; वाचा काय म्हणाले पोंक्षे

लोकसभेच्या शेवटच्या टप्प्यातील मतदान आज होत आहे. मतदान केल्यानंतर माध्यमांशी बोलताना शरद पोंक्षे म्हणाले मोदींच सरकार पुन्हा यावं.

Sharad Ponkshe : राज्यात आज पाचव्या तसंच अंतिम टप्प्यातील मतदान होत आहे. यातील सहा लोकसभा मतदारसंघासाठी मुंबईत मतदान होत आहे. सकाळा 7 वाजल्यापासून मतदानाला सुरूवात झालेली आहे. यामध्ये अनेक क्षेत्रातील मान्यवरांनी मतदान केलं आहे. त्यामध्ये साहित्य, कला, क्रिडा, यासह इतर सर्वच क्षेत्रातील मान्यवरांनी मतदान केलं आहे. दरम्यान, जेष्ठ अभिनेते शरद पोंक्षे यांनीही आपल्या मुलासह मतदान केलं आहे. त्यावेळी त्यांनी आपली प्रतिक्रिया नोंदवली आहे.

 

शरद पोंक्षे यांचा मुलगा पहिल्यांदाच वडिलांसोबत सिनेमात झळकणार; लवकरच घेऊन येणार नवीन चित्रपट

संघाच्या विचारसरणीचं सरकार याव

पोंक्षे यांनी पुन्हा एकदा मोदी सरकार यावं अशी अपेक्षा व्यक्त केली आहे. आपल्या कुटुंबासह मतदान केल्यानंतर पोंक्षे माध्यमांशी बोलत होते. त्यावेळी त्यांनी ही प्रतिक्रिया नोंदवली तसंच, हिंदुत्ववादी विचारसरणीचं सरकार यावं, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विचारसरणीचं सरकार यावं, असंही पोंक्षे म्हणाले आहेत. त्याचबरोबर पोंक्षेंनी हिंदुत्ववादी सरकार असण्याचे फायदेही सांगितले आहेत.

 

काय म्हणाले पोंक्षे?

मतदान केल्यानंतर माध्यांशी बोलताना शरद पोंक्षे म्हणाले, देशासाठी थोडा त्रास सहन करायला हरकत नाही. प्रत्येकाने मतदान केलं पाहिजे. पुन्हा एकदा मोदी यावेत आणि हिंदुत्ववादी विचारसरणीचं सरकार यावं. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विचारसरणीचं सरकार यावं. याचं एकमेव कारण म्हणजे जोपर्यंत हिंदुत्ववाद्यांचं सरकार आहे तोपर्यंत सर्वधर्मीय सुखाने राहणार असंही ते म्हणाले आहेत.

 

Veer Savarkar यांची पोस्ट शेअर करत पोंक्षे म्हणाले, याला म्हणतात

मोदी हवे

शरद पोंक्षेंचा मुलगा म्हणाला, मी पहिल्यांदाच मतदानाचा हक्क बजावला आहे. मतदान करायला लोक गर्दी करताना दिसून येत आहेत. मलाही मोदी यावेत असं वाटत. भाजपाचं सरकार यायला हवं. दरम्यान, शरद पोंक्षे म्हणाले हिंदुत्त्ववादी सरकार हवं. तर मुलगा म्हणाला,मलापण मोदीच हवेत. एकंदरीतच मोदीच यावेत असं पोंक्षे पितापुत्राचं थेट मत असल्याचं दिसून आलं आहे.

follow us