‘अरे जा ना तिकडे…, तेच घिस पिटं वाक्य..; मतदानानंतर राज ठाकरे पत्रकारांवर चिडले

‘अरे जा ना तिकडे…, तेच घिस पिटं वाक्य..; मतदानानंतर राज ठाकरे पत्रकारांवर चिडले

Raj Thackeray : मुंबईत लोकसभेच्य (Loksabha Election) सहा जागांसाठी मतदान सुरू आहे. सकाळपासूनच विविध राजकीय पक्षांचे नेते आपला मतदानाचा हक्क बजावत आहेत. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी देखील कुटुंबीयांसह मतदानाचा हक्क बजावला. मतदान केंद्रावर पोहोचल्यानंतर प्रसारमाध्यमांनी त्यांना फॉलो केले असता राज ठाकरे (Raj Thackeray) पत्रकारांवर चिडल्याचं दिसलं.

Loksabha Election 2024 : ‘या’ सेलिब्रिटींनी बजावला मतदानाचा अधिकार, पाहा फोटो 

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे दक्षिण मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघातील बालमोहन विद्यामंदिर मतदान केंद्रावर मतदानासाठी दाखल झाले होते. यावेळी प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींनी त्यांना फॉलो केले. प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींची गर्दी झाल्यानं राज ठाकरेंनी संताप व्यक्त केला होता. ‘अरे जा ना तिकडे, अजून किती वेळ’ असं म्हणत त्यांनी संताप व्यक्त केला. .दरम्यान, मतदानानंतर त्यांनी माध्यमांशी संवादही साधला.

अनेक मुंबईकर मतदानाचा हक्क बजावण्यासाठी बाहेर पडले नाहीत. अनेक मुंबईकर बाहेर गेलेत, या प्रश्नावर राज ठाकरे म्हणाले, उन्हाळ्याचे दिवस आहेत. ही सुरवात आहे. आतात साडेदहा-पावणे अखरा वाजले आहे. सायंकाळी ५ वाजेपर्यंत बघू किती मतदान होतं. मुंबईकर जास्तीत जास्त बाहेर पडून मतदान करतील, ही अपेभआ आहे, असं ते म्हणाले.

दक्षिण मध्य मुंबई मतदारसंघातील मतदान केंद्रावर घोळ! मतदार यादीत मृतांची नावे, हयात व्यक्तींची नावे गायब… 

काही राजकीय पक्षांचे कार्यकर्ते मतदान केंद्रावर गोंधळ घालत आहेत याविषयी विचारले असता ते म्हणाले, मला त्याबाबत कोणतीही कल्पना नसल्याचं राज ठाकरे म्हणाले.

च ते आपलं घिसं पिटं वाक्य…
मुंबईकरांना काय आवाहन कराल? याविषयी विचारले असता राज ठाकरे म्हणाले, तेच ते आपलं घिसं पिटं वाक्य, मतदानाचा हक्क बजावा. तरुण-तरुणी मोठ्या संख्येने मतदान करतील. ज्यांना पहिल्यांदा मतदानाचा अधिकार मिळाला, असे तरुण मतदान केंद्रावर येईल. काहींच्या आशा संपल्या आहेत, त्यांच्याकडून मतदानाची अपेक्षा करू नका.

मी ज्योतिषी नाही
महिला मतदार एक टर्निंग पॉइंट ठऱतील का? तुला काय वाटतं? असा प्रश्व विचारला असता मी ज्योतिषी नाही, भविष्यवेत्ताही नाही, असं खास ठाकरी शैलीत राज ठाकरेंनी उत्तर दिलं.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube