Air India : काही दिवसांपासून विमानामध्ये साप(snake), उंदीर (rat) शिरल्याच्या बातम्या अनेकदा पाहिल्या किंवा ऐकल्या असतील, पण आता काही तरी भलतच घडलंय. एका महिलेला विंचू (scorpion)चावला आहे. त्याचं झालं असं की, नागपूरहून (Nagpur)मुंबईला (Mumbai)जाणाऱ्या एअर इंडियाच्या विमानात विंचू घुसला आणि त्याने एका महिलेला चावा घेतला आहे. त्यानंतर महिलेची प्रकृती ढासळू लागली. विमान मुंबईत पोहोचताच एअर इंडियाच्या कर्मचाऱ्यांनी महिलेला तातडीने रुग्णालयात दाखल केले.
सद्गगुरू जग्गी शब्द मागे घ्या, महाराष्ट्राची माफी मागा; आव्हाडांनी सद्गुरूंना फटकारले
त्या ठिकाणी प्राथमिक उपचारानंतर महिलेच्या प्रकृतीत सुधारणा होऊ लागली आणि दुसऱ्या दिवशी तिला रुग्णालयातून सोडण्यात आले. ही घटना 23 एप्रिलची असल्याचे समोर आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मुंबईत राहणारी ही महिला काही कामानिमित्त नागपुरात गेली होती. एअर इंडियाच्या नागपूर-मुंबई फ्लाइटने (AI 630) ती महिला परतली. नियोजित वेळेत ती महिला आपल्या सीटवर बसली आणि फ्लाईटनेही ठरलेल्या वेळेत उड्डाण घेतलं.
विमान आकाशात पोहोचताच अचानक महिलेच्या ओरडण्याचा आवाज आला. फ्लाईट अटेंडंटने लगेच तिच्याजवळ जाऊन चौकशी केली, तेव्हा समजले की, या महिलेला विंचूने दंश केल्याचे समोर आले. ही बातमी समजताच बाकीचे प्रवासीही घाबरले.
घाईघाईत संपूर्ण विमान तपासले, पण विंचू कुठेच सापडला नाही. तर दुसरीकडे महिलेची प्रकृती गंभीर होत होती. अशा परिस्थितीत मुंबई विमानतळावर पोहोचताच महिलेला प्रथम विमानातून उतरवून रुग्णालयात नेण्यात आले.
प्राथमिक उपचारानंतर काही वेळातच महिलेच्या प्रकृतीत सुधारणा होऊ लागली. डॉक्टरांनी त्याला रात्रभर हॉस्पिटलमध्ये ठेवले आणि दुसऱ्या दिवशी त्याला डिस्चार्ज देण्यात आला आहे. दुसरीकडे, एअर इंडियाने याबाबत अधिकृत निवेदन जारी केले आहे.
या घटनेला दुजोरा देत कंपनीने प्रवाशांना झालेल्या गैरसोयीबद्दल दिलगिरी व्यक्त केली आहे. यामध्ये माहिती मिळताच महिलेसाठी योग्य वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्याचे सांगण्यात आले. त्याचवेळी, मुंबईला पोहोचल्यानंतर, रुग्णालयात दाखल केल्यानंतर तिला डिस्चार्ज मिळेपर्यंत त्यांची टीम महिलेसोबत उपस्थित होती.