Download App

अर्थखाते मिळताच अजित पवार सिल्वर ओकवर, कारण काय ?

  • Written By: Last Updated:

Pratibha Pawar राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्या पत्नी प्रतिभा पवार (Pratibha Pawar) यांना आज मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात (Breach Candy Hospital) दाखल करण्यात होते. प्रतिभा पवार यांच्यावर शस्त्रक्रिया झाली. दरम्यान, आता उपमुख्यमंत्री अजित पवार हे सिल्वर ओकवर दाखल झाले आल्याचे वृत्त आहे. प्रतिभा पवार यांच्या तब्येतीची चौकशी करण्यासाठी अजित पवार सिल्वर ओकवर गेले आहेत (Ajit Pawar at Silver Oak to inquire about Pratibha Pawars health)

प्रतिभा पवार यांना शस्त्रक्रिया करण्यासाठी आज रुग्णालयात दाखल केले होते. त्यांच्यावर शस्त्रक्रिया झाली असून त्यांना आता घरी आणल्याची माहिती आहे. आता उपमुख्यमंत्री अजित पवार हे आपल्या काकी असलेल्या प्रतिभा पवार यांच्या तब्येतीची विचारपूस करण्यासाठी त्यांच्या घरी दाखल झाले आहेत. त्यांनी प्रतिभा पवार यांची भेट घेतली. त्यांच्या तब्येतीची विचारणा केली. अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये बंड करून शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सहभागी झाले होते. शिंदे सरकारमध्ये सामील झाल्यानंतर अजित पवार यांना उपमुख्यमंत्रीपद मिळाले. दरम्यान, राष्ट्रवादी अजित पवारांच्या बंडामुळं फुट पडल्यामुळं शरद पवार गटाकडून अजित पवारांसह त्यांच्या समर्थक आमदारांवर कायम टीका केली गेली.

रोहित पवारांचे शब्द खरे ठरले; योग्यवेळी पॉवर दाखवत अजितदादांनी मिळवले अर्थखाते 

दरम्यान, आज राष्ट्रवादीच्या मंत्र्यांना खातेवाटप झाले असून अजित पवारांना अर्थ खाते मिळालं. या खातेवाटपानंतर अजित पवार हे काकी प्रतिभा पवार यांची घेण्यासाठी सिल्वर ओकवर गेले आहेत. राष्ट्रवादीतील बंडानंतर ते पहिल्यांदाच सिल्वर ओकवर गेले आहेत. त्यामुळं चर्चांना उधान आलं आहे. अजित पवार नेमके सिल्वर ओकवर कशाला गेले? ही भेट नेमकी कशासाठी अशी चर्चा सुरू झाली. मात्र राष्ट्रवादी काँग्रेसमधील अजित पवार यांच्या गटातील सुनील तटकरे, अमोल मिटकरी यांनी ही भेट कौटुंबिक असून या भेटीचे राजकीय अर्थ काढू नये, असं स्पष्ट केलं.

 

 

Tags

follow us