Download App

समस्त माता-भगिनींचा आपल्याला अभिमान; अजित पवारांनी दिल्या महिला दिनाच्या शुभेच्छा

मुंबई : महाराष्ट्राच्या मातीला राजमाता जिजाऊ माँ साहेबांच्या विचारांचा, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या कर्तृत्वाचा, राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या नेतृत्वाचा वारसा लाभला आहे. महाराष्ट्राचा हा गौरवशाली वारसा आजची स्त्रीशक्तीही समर्थ आणि यशस्वीपणे पुढे नेत आहे, अशा शब्दात विरोधी पक्ष नेते अजित पवार यांनी ‘आंतरराष्ट्रीय महिला दिना’निमित्त राज्यातील जनतेला शुभेच्छा दिल्या आहे.

पुढे बोलताना अजित पवार म्हणाले, कृषी, कला, क्रीडा, विज्ञान, राजकारण, समाजकारण, उद्योग, व्यापार अशा विविध क्षेत्रात कर्तृत्व गाजवणाऱ्या स्त्रीशक्तीचा महाराष्ट्राला अभिमान आहे. यावेळी पवार यांनी समस्त स्त्रीशक्तीचा गौरव करत त्यांच्या कार्याला शुभेच्छा दिल्या.

तुम्ही जनतेच्या भल्यासाठी काय केलं? विखेंचा बाळासाहेब थोरातांना सवाल

विरोधी पक्षनेते अजित पवार आपल्या शुभेच्छा संदेशात म्हणाले की, महाराष्ट्रातील स्त्रीशक्तीला त्यांचा हक्क, मान-सन्मान, सुरक्षित वातावरण देण्याचा आपण सर्वांनी निर्धार करूया. महाराष्ट्रातील स्त्रीशक्तीला मिळालेला महानतेचा वारसा त्या अधिक समर्थपणे पुढे नेत आहेत.

राहुल गांधींनी उल्लेख केलेली मुस्लिम ब्रदरहुड आहे तरी काय? जाणून घ्या

शेती, नोकरी आणि व्यवसाय करुन आपल्या कुटुंबाला हातभार लावणाऱ्या राज्यातील समस्त माता-भगिनींचा आपल्याला अभिमान आहे. राष्ट्रनिर्मितीतील स्त्रीशक्तीच्या योगदानाबद्दल कृतज्ञता व्यक्त करतो, अशा शब्दात विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी स्त्रीशक्तीचा आपल्या संदेशात गौरव केला आहे.

Tags

follow us