Download App

‘सूत्रधार शोधता येतो पण सरकारची इच्छाशक्ती पाहिजे’, अजित पवारांचा हल्लाबोल

Ajit Pawar on Kolhapur violence : कोल्हापूरमध्ये कायदा व सुव्यवस्था अडचणीत (Kolhapur violence) आणण्याच्या काही घटना जाणीवपूर्वक करण्यात आल्या आहेत. त्याआधी वेगवेगळ्या भागात दंगली घडवून आणण्यासारखे प्रकार होत आहेत. त्यामुळे कायदा व सुव्यवस्था अडचणीत येत आहे. राज्यात शांतता निर्माण करणं मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांची जबाबदारी आहे. वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांची जबाबदारी आहे. दंगलीमागे कोण आहे हे तपासले पाहिजे. दंगलीचा सूत्रधार शोधता येतो पण सरकारची इच्छाशक्ती पाहिजे, असा हल्लाबोल विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी केला आहे.

येणाऱ्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून पुरोगामी विचारांच्या महाराष्ट्रात कायदा व सुव्यवस्था अडचणीत आणून समाजासमाजामध्ये अंतर पाडण्याचे काम किंवा द्वेष निर्माण करण्याचे काम काही शक्ती जाणीवपूर्वक करत आहेत का? त्यातून त्यांना वेगळा स्वार्थ साधायचा आहे का असा थेट सवाल अजित पवार यांनी केला आहे.

ते पुढं म्हणाले की अलीकडच्या काळात ज्या घटना घडत आहेत त्याच्याबद्दल खोलात जायचं म्हटलं तर मोबाईल कुणाचे, कुठे गेले आहेत. व्हॉटस्ॲपवर काय बातम्या आल्या आहेत. कुणी व्हायरल केले आहे. हे तपासायचं म्हटलं तर तपासता येतं. परंतु या गोष्टीचा छडा लागलाच पाहिजे अशापध्दतीची भूमिका राज्यकर्त्यांची असली पाहिजे आणि पोलीस खात्याचे काम करणार्‍या अधिकारीवर्गाची असली पाहिजे असे स्पष्ट मत अजित पवार यांनी व्यक्त केले.

औरंगजेबाचं समर्थन कुणी का अन् कसं करेल? नगरच्या घटनेवर अजित पवार संतापले

कालच कोल्हापूरमध्ये पोलिसांना आणि मिडियाला तिथल्या लोकांनी आंदोलन करत असताना कोल्हापूर बंद करणार असे सांगितले होते. वास्तविक त्याच्या आधी पोलिसांनी सर्वपक्षीय बैठक घेऊन किंवा अशाप्रकारच्या घटना घडतात त्यावेळी शांतता कमिटी असते किंवा स्वयंसेवी संस्था काम करणाऱ्या असतात त्या त्या शहरात, तालुक्यात, जिल्हा ठिकाणी पोलीस यंत्रणा असते त्यांना कुणाला एकत्र घेतल्यानंतर नीटपणे हाताळता येईल ही इत्यंभूत माहिती त्यांच्याकडे असते. फक्त त्याला राजकीय इच्छाशक्ती असली पाहिजे आणि सरकारचा त्यांना क्लीअर आदेश असला पाहिजे की हे घडू द्यायचे नाही असेही अजित पवार म्हणाले.

अशाप्रकारच्या गोष्टी आमच्याही काळात घडल्या आहेत. पोलीस अधिकाऱ्यांना विश्वासात घेतले आणि सरकार याबाबत कडक भूमिका घेणार आहे हे सांगितले तर त्यावेळी ते हाताळण्याची आपल्या पोलीस दलाची क्षमता आहे असा विश्वास अजित पवार यांनी व्यक्त केला.

Jitendra Aawhad : पराभवापासून वाचण्यासाठी शिंदे-फडणवीस सरकारच दंगली घडवतयं; आव्हाडांचा गंभीर आरोप

वेगवेगळ्या जाती, धर्म, पंत हे सगळेजण यामध्ये गुण्यागोविंदाने नांदत आहेत. मात्र कुठल्या जातीने, पंथाने एखाद्याचा द्वेष करा असे सांगितले नाही परंतु वाढलेली महागाई, वाढलेली बेरोजगारी व सत्तेत आल्यावर ७५ हजार नोकरभरती करु या सगळ्या गोष्टी प्रत्यक्षात कृतीमध्ये आणता आल्या नाहीत त्यामुळे जाणीवपूर्वक कुणी खतपाणी घालतंय का? याचा मास्टरमाईंड कोण आहे? कोण हे करण्यासाठी प्रोत्साहित करतंय? या सगळ्याचा छडा लावण्याचे काम पोलीस खात्याने केले पाहिजे असे अजित पवार यांनी मत व्यक्त केले.

Tags

follow us