Ajit Pawar : औरंगजेबाचं समर्थन कुणी का अन् कसं करेल? राज्यातील घटनांवर अजित पवार संतापले
Ahmednagar : अहमदनगरमधील मुकुंदनगर भागात संदल मिरवणुकीदरम्यान, औरंगजेबाच्या प्रतिमा घेऊन तरुणांनी नाच केला. त्यानंतर कोल्हापूरमध्ये व्हॉट्सअॅप स्टेटस ठेवण्यात आला. यावरुन कोल्हापूरमध्ये तणावपूर्ण वातावरण तयार झालं आहे. त्यावर राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार संतापले आहेत. औरंगजेबाचं समर्थन कुणी का अन् कसं करेल? असा सवाल अजित पवार यांनी उपस्थित केला आहे. (Ajit Pawar Speak On the image of Aurangzeb was highlighted at Ahmednagar)
क्रॉप शर्ट आणि डेनिम जीन्समध्ये तमन्ना भाटियाचा कहर, पाहा किलर लूक
पुढे बोलताना पवार म्हणाले, औरंगजेबाचं समर्थन करण्याचं काहीच कारण नाही. छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रात औरंगजेबाचं समर्थन कसं कोणी करेल आणि ते का करावं? उगीचच त्या घटनेला वेगळं स्वरूप देऊ नका, असंही ते म्हणाले आहेत.
ठाकरेंच्या पॉडकास्टची फडणवीसांकडून खिल्ली; म्हणाले, त्यांचं फक्त फेसबुक लाईव्ह…
अफझल खान असेल किंवा औरंगजेब असेल या लोकांचं समर्थन करण्याचं काहीच कारण नाही. कोणीही त्यांचं समर्थन करणार नाही. अशा प्रकारच्या बातम्या पसरवून लोकांमध्ये गैरसमज निर्माण करण्याचं काम कोणी करत तर त्यांच्यावर कारवाई केली करण्याची ते म्हणाले आहेत.
खळबळजनक! मुंबईत शासकीय वसतिगृहात तरुणीची हत्या, संशयित चौकीदाराचाही आढळला मृतदेह
दरम्यान, समाजात एकमेंकांबद्दल अडी निर्माण करण्याचं किंवा तेढ निर्माण करण्याचं काम कोणी करत असेल तर त्यांच्यावर कारवाई केली पाहिजे, अशी मागणीही अजित पवार यांनी केली आहे.
दरम्यान, संदल मिरवणुकीत औरंगजेबाची प्रतिमा हातात घेऊन नाचण्याचा प्रकार घडला होता. त्यानंतर भिंगार कॅम्प पोलिसांकडून चार जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला. यासंदर्भातील व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता.