Ivan Menezes : पुण्यात जन्मलेले सुप्रसिद्ध मद्य कंपनीचे मालक इवान मनेजेस यांचं निधन…

Ivan Menezes : पुण्यात जन्मलेले सुप्रसिद्ध मद्य कंपनीचे मालक इवान मनेजेस यांचं निधन…

Ivan Menezes :
मद्य कंपनी डियाजिओचे भारतीय वंशाचे सीईओ इव्हान मैनुअल मेनेजेस यांचं आज बुधवारी निधन झालं आहे. लंडनमध्ये त्यांच्या मृत्यूचे कारण लगेच समजू शकले नाही, मात्र, त्यांच्यावर उपचार सुरु असल्याची माहिती समोर आली होती. रुग्णालयात उपचार सुरु असतानाच त्यांनी 64 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

Video : भर भाषणात मुख्यमंत्री केजरीवालांना अश्रू अनावर; म्हणाले मनीष सिसोदिया लवकरच…

मेनेजेस यांना पोटाच्या अल्सरचा त्रास होता. त्यांच्यावर शस्त्रक्रियाही करण्यात आली होती. मात्र, शस्त्रक्रियेनंतरही त्यांची प्रकृती बरी होत नव्हती, असं डियाजिओने प्रसिद्ध केलेल्या निवेदनात म्हटलं आहे.

Samir Choughule: हास्यजत्रा फेम समीर चौगुलेवर माफी मागण्याची वेळ का आली? म्हणाला, ‘स्किट भोवलं..’

मेनेजेस यांचा पुण्यात जन्म झाला. त्यांचे वडिल मैनुअल मेनेजेस भारतीय रेल्वे बोर्डाचे अध्यक्ष होते. मेनेजेस यांनी दिल्लीतील प्रतिष्ठित सेंट स्टीफन्स कॉलेज आणि IMM, अहमदाबाद येथे शिक्षण घेतलं. त्यानंतर 1997 मध्ये ते डिएजिओमध्ये सामील झाले. ते जुलै 2012 मध्ये कार्यकारी संचालक आणि जुलै 2013 मध्ये सीईओ बनले होते. त्यांना 2023 मध्ये ‘नाइट’ ही पदवी देण्यात आली.

..तर मोदीही राहिले असते मागे; पवारांनी सांगितलं उपराष्ट्रपतींना डावलण्याचं राजकारण

डियाजिओ कंपनी आता जगभरातील 180 पेक्षा जास्त बाजारपेठांमध्ये 200 पेक्षा अधिक ब्रँड विकत आहे. स्कॉच व्हिस्की, वोडका, जिन, रम, कॅनेडियन व्हिस्की, लिकर्स आणि टकीलामध्ये डियाजिओ नंबर एक कंपनी आहे. कंपनीने अवघ्या 8 वर्षात हे स्थान मिळवले आहे.

नगरच्या शिरपेचात मानाचा तुरा! ‘माझी वसुंधरा’ अभियानात मारली बाजी

मेनेजेस यांच्यावर उपचार सुरु असतानाच त्यांच्याजागी डेब्रा क्रू यांच्यावर सीईओपदी नियुक्ती करण्यात आली होती. मेनेजेस यांची जुलै 2013 मध्ये सीईओ म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. त्याआधी ते स्कॉच व्हिस्की असोसिएशन कौन्सिलचे अध्यक्षही होते.

तसेच ते टेपेस्ट्रीचे कार्यकारी संचालक, केलॉग स्कूल ऑफ मॅनेजमेंटमधील जागतिक सल्लागार मंडळाचे सदस्य, मूव्हमेंट टू वर्कचे विश्वस्त आणि आंतरराष्ट्रीय अलायन्स फॉर रिस्पॉन्सिबल ड्रिंकिंगचे सदस्य देखील होते.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube