Video : भर भाषणात मुख्यमंत्री केजरीवालांना अश्रू अनावर; म्हणाले मनीष सिसोदिया लवकरच…

Video : भर भाषणात मुख्यमंत्री केजरीवालांना अश्रू अनावर; म्हणाले मनीष सिसोदिया लवकरच…

Arvind Kejariwal : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी दिल्लीमध्ये आज बवाना परिसरामधील दरियापूर गावातील स्कूल ऑफ स्पेशलायज्ड एक्सलन्सचं उद्घाटन केलं. यावेळी त्यांनी तेथे उपस्थितांना संबोधित केलं. या भाषणामध्ये मात्र मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल हे भावूक झाल्याचं त्यांना अश्रु अनावर झाल्याचं पाहायाला मिळालं आहे. त्यांना इतके रडायाला येत होतं की, त्यांना पाणी देखील द्यावे लागले. त्यातच त्यांनी आपले सहकारी दिल्लीचे माजी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांच्या कामाबद्दल त्यांच्या आठवणीना उजाळा दिला. ( Delhi CM Arvind Kejriwal Cried During Speech to remembers Manish Sisodia )

या भाषणामध्ये अरविंद केजरीवाल यांनी मनीष सिसोदिया यांच्या अटकेप्रकरणी भाजप सरकारवर हल्लाबोल केला. तसेच त्यांनी मनीष सिसोदिया यांच्या कामांना आपल्याला पुढे न्यायचं आहे आणि ते लवकरच तुरूंगातून सुटतील अशी आशा व्यक्त केली आहे. केजरीवाल म्हणाले की, हे मनीष सिसोदियांचं स्वप्न होतं. पण विरोधक दिल्लीतील शिक्षण धोरण संपवण्याच्या मागे आहेत. आम्ही ते संपवू देणार नाही. मनीषजींनी याची सुरूवात केली होती. त्यांच स्वप्न होत की, प्रत्येक मुलाला चांगलं शिक्षण मिळालं पाहिजे.

Sachin Pilot : वडिलांच्या पुण्यतिथीला सचिन पायलट घेणार आक्रमक भूमिका? समोर आली मोठी माहिती

मात्र या भाजपने खरे-खोटे आरोप करत त्यांनी कित्येक महिन्यांपासून तुरूंगात टाकलं. देशात इतके मोठ-मोठे डाकू फिरत आहेत त्यांना नाही पकडत आणि मनीष सिसोदियांना तुरूंगात टाकलं आहे. ते मुलांना चांगलं शिक्षण देत आहेत. चांगल्या शाळा बनवत आहेत. त्यांनी जर हे चांगल काम केलं नसत तर त्यांना तुरूंगात टाकलं नसतं.

Polluted Cities In India : प्रदुषित शहरांच्या यादीत भिवंडी शहर तिसऱ्या क्रमांकावर…

भाजपला याचा त्रास होत आहे की, दिल्लीत चांगल्या शाळा बनत आहेत. गरिब मुलांना माफक दरात शिक्षण मिळतय. आम आदमी पार्टीचा प्रचार होत आहे. मी सर्वत्र गेलो की हेच ऐकायला मिळत की, दिल्लीतील शाळा चांगल्या आहेत. मुलांची टक्केवारी वाढलीय. त्यामुळेच त्यांना त्रास होत आहे. पण मनीष सिसोदियांनी चांगलं शिक्षण, शाळा बनवल्या नसत्या तर त्यांना तुरूंगात टाकलं नसतं. असं केजरीवाल म्हणाले. यावेळी लोकांनी केजरीवाल आणि सिसोदियांच्या नावाने घोषणा देखील दिल्या.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube