नगरच्या शिरपेचात मानाचा तुरा! ‘माझी वसुंधरा’ अभियानात मारली बाजी

नगरच्या शिरपेचात मानाचा तुरा! ‘माझी वसुंधरा’ अभियानात मारली बाजी

Majhi Vasundhara Abhiyan : माझी वसुंधरा (Majhi Vasundhara) अभियान 3.0 अंतर्गत भूमी, जल, वायू, अग्नी व आकाश या निसर्गाशी संबंधित पंच तत्वावर आधारित स्थानिक स्वराज्य संस्थांची स्पर्धा घेण्यात आली. या स्पर्धे अंतर्गत 3 ते 10 लक्ष लोकसंख्येच्या गटामध्ये सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या अमृत शहरामध्ये अहमदनगर महानगरपालिकेचा (Ahmednagar Municipal Corporation) राज्यात दुसरा क्रमांक आला असून 6 कोटींचे पारितोषिक जाहीर झाले. Majhi Vasundhara Abhiyan Ahmednagar Municipal Corporation

Bal Shivaji: आकाश ठोसर साकारणार ‘बाल शिवाजी’, राज्याभिषेकाच्या ३५०व्या जयंती निमित्त सिनेमाचा फर्स्ट लूक प्रदर्शित 

मुंबई येथे सोमवारी (दि. ५) रोजी सम्मान सोहळ्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते अहमदनगर महानगरपालिकेच्या पदाधिकारी व अधिकारी यांना सन्मानचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले. महापौर रोहिणी शेंडगे, आयुक्त डॉ.पंकज जावळे, महिला व बाल कल्याण समिती सभापती पुष्पा बोरुडे, उपायुक्‍त यशवंत डांगे, प्रभाग अधिकारी मेहेर लहारे, प्रसिद्धी व उद्यान अधिकारी शशिकांत नजान यांनी हा पुरस्कार स्वीकारला.

BMC Elections: ठाकरे गटाची चांदी, राष्ट्रवादीही साधणार डाव? अजितदादांनी केला मोठा खुलासा

माझी वसुंधरा अभियाना अंतर्गत पर्यावरणाचे संवर्धन, संरक्षण व जतन करण्यासाठी अहमदनगर महानगरपालिकाने केलेल्या कामगिरीबाबत पर्यावरण व वातावरणीय बदल विभाग आणि माझी वसुंधरा अभियान संचालनालय यांच्यावतीने महापालिका आयुक्त, महापौर, पदाधिकारी व अहमदनगर महानगरपालिकेचे अभिनंदन करण्यात आले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झालेल्या या सोहळ्यास विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर, महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, मंत्री शंभूराजे देसाई, प्रधान सचिव प्रवीण दराडे आदी मान्यवर उपस्थित होते.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube