Bal Shivaji: आकाश ठोसर साकारणार ‘बाल शिवाजी’, राज्याभिषेकाच्या ३५०व्या जयंती निमित्त सिनेमाचा फर्स्ट लूक प्रदर्शित 

Bal Shivaji: आकाश ठोसर साकारणार ‘बाल शिवाजी’, राज्याभिषेकाच्या ३५०व्या जयंती निमित्त सिनेमाचा फर्स्ट लूक प्रदर्शित 

Bal Shivaji Movie : ‘बाल शिवाजी’ (Bal Shivaji) या सिनेमाची घोषणा गेल्या काही दिवसांअगोदर करण्यात आला होता, तेव्हापासून शिवभक्तांमध्ये या सिनेमाची मोठी उत्सुकता लागली आहे. आज छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाच्या 350 व्या जयंती निमित्त ‘बाल शिवाजी’ या सिनेमाचा फर्स्ट लूक (first look) प्रदर्शित करण्यात आला आहे. या सिनेमात ‘सैराट’ फेम आकाश ठोसर (Akash Thosar) ‘बाल शिवाजी’च्या भूमिकेमध्ये दिसणार आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Akash Thosar (@akashthosar)


‘बाल शिवाजी’ या बहुचर्चित सिनेमामध्ये शिवरायांचा वय वर्षं 12 ते 16 पर्यंत त्यांच्या आयुष्यामध्ये घडलेल्या रंजक गोष्टी बघायला मिळणार आहेत. यामुळे आता छत्रपती शिवरायांच्या बालपणीचा जीवन प्रवास रुपेरी पडद्यावर बघण्यासाठी शिवभक्त मोठ्या प्रमाणात उत्सुक झाले आहेत. सुपरहिट सिनेमे देणारे रवी जाधव (Ravi Jadhav) या सिनेमाच्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळली आहेत. ‘सैराट’ फेम आकाश ठोसर म्हणजे परश्या हा शिवरायांच्या भूमिकेमध्ये चाहत्यांना दिसून येणार आहे.

आकाशने या सिनेमाचे पोस्टर शेअर करत लिहिले आहे की, लहान असो वा मोठा वाघ ‘वाघच’ असतो. महाराष्ट्राचे दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या 350 व्या शिवराज्याभिषेक दिनानिमित्त सादर आहे.  स्वराज्याच्या पायाभरणीची अद्भुत गाथा ‘बाल शिवाजी’ हा महासिनेमाचे पहिले पोस्टर”. आकाश ठोसरच्या या पोस्टवर जय शिवराय, जगदंब, जय भवानी जय शिवाजी, अशा कमेंट्स चाहत्यांनी मोठ्या प्रमाणात केल्या आहेत.

‘बाल शिवाजी’ या सिनेमाबद्दल बोलत असताना दिग्दर्शक रवी जाधव म्हणाले आहेत की,”माझा सिनेमा छत्रपती शिवाजी महाराजांचे आई- वडील, जिजामाता आणि शहाजी राजे भोसले यांनी लहानपणी त्यांचा भक्कम पाया रचून दिलेले अमूल्य योगदान दाखवले जाणार आहे. तसेच लहानपणापासूनच एक योद्धा आणि शासक म्हणून त्यांची कौशल्ये कशी तीक्ष्ण झाली हे दाखवण्याचा प्रयत्न केला आहे.

वात्सल्यमूर्ती सुलोचना दीदींची कारकीर्द; ऑनस्क्रीन ‘या’ अभिनेत्यांच्या आईची भूमिका साकारली

रवी जाधव पुढे म्हणाले की, ‘मी गेल्या ९ वर्षांमध्ये ‘बाल शिवाजी’ या सिनेमाच्या संहितेवर काम करत आहे. दिग्दर्शक म्हणून मी पहिल्यांदा ऐतिहासिक सिनेमा करणार आहे. सिनेमाची कथा संदीप सिंह यांनी समजून घेतली आहे. मुख्य भूमिकेसाठी आकाश ठोसरची आम्ही एकमताने निवड केली असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले आहे. तरुण राजाची भूमिका साकारण्यासाठी त्याच्याकडे राजसी रूप आणि व्यक्तिमत्त्व आहे. या भूमिकेसाठी त्याचा उत्साह आणि उत्सुकता पाहून मी प्रभावित झालो असल्याचे सांगितले आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube