..तर मोदीही राहिले असते मागे; पवारांनी सांगितलं उपराष्ट्रपतींना डावलण्याचं राजकारण

..तर मोदीही राहिले असते मागे; पवारांनी सांगितलं उपराष्ट्रपतींना डावलण्याचं राजकारण

नव्या संसद भवनाच्या उद्घाटनावर (New parliament Building) बराच वाद झाला. या इमारतीचे उद्घाटन राष्ट्रपतींच्याच हस्ते व्हावे. त्यांनाही या कार्यक्रमाला बोलवावे अशी मागणी काँग्रेससह अन्य विरोधी पक्षांनी या कार्यक्रमावर बहिष्कार टाकला. त्यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी या मुद्द्यावर पुन्हा एकदा मोदी सरकारवर घणाघाती टीका केली.

पवार आज छत्रपती संभाजीनगरच्या दौऱ्यावर होते. येथे आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात त्यांनी नवीन संसद भवन इमारतीच्या उद्घाटनाच्या मुद्द्यावर मोदी सरकारवर जोरदार प्रहार केले. या कार्यक्रमाला राष्ट्रपतींना तर बोलावलचं नव्हतं. पण, उपराष्ट्रपतींनाही बोलावलं नव्हतं. यामागे काय राजकारण होतं याचा खुलासाही त्यांनी केला.

‘जागरूक राहा, आपण चुकलो तर जनता’.. शरद पवारांचा आघाडीच्या नेत्यांना इशारा

ते म्हणाले, मी सध्या राज्यसभेत आहे. राज्यसभेचे प्रमुख उपराष्ट्रपती आहेत. त्यांनाही निमंत्रण नव्हतं. मी चौकशी केली पण कुणी उत्तर द्यायला तयार नव्हतं. कुणीतरी कानात सांगितलं की जर उपराष्ट्रपतींना निमंत्रण दिलं असतं तर प्रोटोकॉलनुसार उपराष्ट्रपती पुढे राहिले असते त्यानंतर प्रधानमंत्री आणि बाकीच्यांना सदनात प्रवेशाची संधी मिळाली असती. त्यामुळे कदाचित त्यांना निमंत्रण दिलं गेलं नसावं.

या गोष्टी आपल्या देशात कधीच घडल्या नाहीत. उपराष्ट्रपती काय किंवा सभापती काय या संस्था आहेत. त्यांची प्रतिष्ठा जर आम्ही जपली नाही तर सर्वसामान्य लोकांना त्याबद्दल यत्किंचितही आस्था वाटणार नाही. या सगळ्या घडामोडींवरून या संस्थांकडे बघण्याचा कसा दृष्टीकोन आहे त्याचे चित्र दिसत आहे आणि हे चित्र चिंताजनक आहे, अशी खंत त्यांनी व्यक्त केली.

जागरूक राहा, नाहीतर.. 

पवार म्हणाले, सर्वसामान्य नागरिकांवर माझा विश्वास आहे. राजकारणी चुकले की ते मार्ग दाखवतात. इंदिरा गांधींसारख्या जबरदस्त नेत्यांचा पराभव जनतेने केला. ज्याच्या हातात सत्ता दिली, त्यावेळी जबाबदारी पार पाडली नाही म्हणून मोरारजी देसाई यांची सत्ता गेली. लोकं शहाणपणाचे निर्णय घेतात.

Pune Loksabha By Election : पुणे लोकसभेच्या जागेवरुन काँग्रेस-राष्ट्रवादीत दुमत पण…

ज्या राज्यात भाजपची सत्ता नाही तेथेही त्यांनी सत्ता हातात घेतली. गोवा हे त्याचे उदाहरण आहे. त्यामुळे आता आपल्याला सावध होण्याची गरज आहे. विरोधी पक्षांनी एकत्र येऊन विश्वासदर्शक निर्णय घेतले तर लोक पर्याय बदलतील. मात्र आम्ही चुकलो तर वेगळा पर्यायही लोक स्वीकारू शकतात, असा इशारा पवार यांनी विरोधी पक्षाच्या नेत्यांना दिला.

 

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube