Ajit Pawar met Nawab Malik : माजी मंत्री नवाब मलिक (Nawab Malik) यांना सुप्रीम कोर्टाने जामीन मंजूर केल्यापासून राष्ट्रावादीचे नेते सातत्याने त्यांच्या भेटी घेत आहेत. आज उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्यासह दिलीप वळसे पाटील आणि हसन मुश्रीफ यांनीही भेट घेतली. यावेळी अजित पवार यांनी त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. याआधी प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांनी त्यांची भेट घेतली होती.
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांना सोमवारी (14 ऑगस्ट) मुंबईतील एका खासगी रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. मनी लाँड्रिंग प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने त्यांना दोन महिन्यांसाठी अंतरिम जामीन मंजूर केला होता. या प्रकरणी त्यांना 2022 च्या सुरुवातीला अटक करण्यात आली होती.
विशेष न्यायालयाने त्यांच्या जामिनाच्या अटी निश्चित केल्या आहेत, त्यातील एक म्हणजे त्यांना मीडियाशी बोलता येणार नाही. ईडीने अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम आणि त्याच्या साथीदारांशी संबंधित कथित प्रकरणात फेब्रुवारी 2022 मध्ये मलिक यांना अटक केली होती.
भारताविरोधात घोषणाबाजी करणाऱ्यांना शिवेसेनेच्या युवा नेत्याने भर कोर्टात चोपले
अजित पवार गटात जाणार?
दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसतील बंडखोरीनंतर पक्षात शरद पवार आणि अजित पवार असे दोन गट तयार झाले आहेत. अशा स्थितीत नवाब मलिक यांच्यासमोर कोणत्या गटात सामील व्हावे, असा पेच आहे. मात्र, मलिक अजित पवार यांच्या गोटात सामील होऊ शकतात, अशी चर्चा राजकीय वर्तुळात आहे. अजित गटात सहभागी होण्याच्या अटीवरच मलिक यांना जामीन मिळाल्याचीही चर्चा सुरू आहे. दरम्यान, नवाब मलिक घरी आल्यापासून अजित पवार गटातील नेते त्यांच्या भेटी घेत आहेत.
पवारांच्या बीडच्या सभेला अजितदादांकडून प्रत्युत्तर, बीडमधूनच करणार ‘महाराष्ट्र परिक्रमा’
शिंदे-फडणवीसांना चालणार का?
देवेंद्र फडणवीस यांनी नवाब मलिक यांच्यावर अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमशी संबंध असल्याचा आरोप केला होता. त्यांच्यावर टेरर फंडिंग आणि भ्रष्टाचाराचे आरोपही केले होते. अशा स्थितीत दीड वर्षापूर्वी खुद्द देवेंद्र फडणवीस यांनी नवाब मलिक यांना देशद्रोही, भ्रष्टचारी आणि दाऊद इब्राहिमशी संबंध म्हटले होते. त्याच मलिकांना भाजप आणि एनडीए स्वीकारतील का, असा सवाल केला जात आहे.